Chhatrapati Shivaji Role: अजयच्या ‘तानाजी’त शिवराय साकारलेल्या कलाकाराने प्रभासला ‘बाहुबली’ केले..

अभिनेता रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफीसवर पैशांचा पाऊस पाडला आहे. या चित्रपटात रितेश याने शिवरायांची भूमिका चांगली वटवली आहे. मात्र, आता अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटातील शिवरायांची भूमिका करणाऱ्या मराठी कलाकाराची चर्चा सुरु आहे.

Chhatrapati Shivaji Role: अजयच्या  ‘तानाजी’त शिवराय साकारलेल्या कलाकाराने प्रभासला ‘बाहुबली’ केले..
Ajay devgan and prabhas (1)
| Updated on: May 03, 2026 | 8:53 PM

Chhatrapati Shivaji Role In Tanhaji: सध्या रितेश देशमुख याचा मल्टीस्टारर चित्रपट ‘राजा शिवाजी’ तिकीटबारीवर जबरदस्त गल्ला खेचत आहे. या चित्रपटात रितेश याने छत्रपती शिवाजी महाराज यांची दमदार भूमिका केली आहे आणि ती चाहत्यांनाही पसंद पडली आहे. या आधीही अनेक अभिनेत्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शिवरायांबद्दल तमाम जनतेला प्रेम असल्यामुळे त्यांच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतातच..अजय देवगण याने साल २०२० मध्ये  ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट केला होता. त्यातही शिवाजी महाराजांचे कॅरेक्टर एका गुणी मराठी कलाकाराने साकारले होते, ते होते शरद केळकर. शरद केळकर यांचा प्रभास याचा चित्रपट बाहुबलीशीही कनेक्शन आहे. शरद केळकर याच्याशिवाय प्रभासला बाहुबली साकारता आला नसता का ते वाचा…

‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ 10 जानेवारी 2020 रिलीज झाला होता. हा सिनेमा छत्रपती शिवरायांचा तडफदार आणि बहादूर मावळा सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर होता. यात तानाजीची भूमिका अजय देवगण याने साकारली होता. हा चित्रपट खूप चालला. यात शिवरायांचे कॅरेक्टर अभिनेता शरद केळकर यांनी साकारले होते. त्यांच्या दमदार आवाज आणि अभिनयाने शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व पडद्यावर धारदार झाले होते. प्रेक्षकांना शरद केळकर यांचा शिवराय देखील आवडला होता.

शरद होते ‘बाहुबली’ चा आवाज

शरद केळकर यांनी टीव्ही,मराठी नाटकात काम केले असून त्यांची हाईट आणि व्यक्तीमत्व तसेच आवाज खूप दमदार आहे.याच कारणामुळे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी बाहुबलीत प्रभास यांच्या हिंदी डबिंगसाठी शरद केळकर यांची निवड केली. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ मध्ये शरद केळकर बाहुबली प्रभासचा हिंदीतील आवाज बनले आहेत. प्रभास दमदारपणे हिंदीत बोलताना पाहून प्रेक्षकांना तो त्यांचा खरा आवाज वाटला. त्यामुळे बाहुबली कॅरेक्टर हीट होण्यामागे शरद केळकर यांचा आवाज आहे.

साहो, आदिपुरुष चित्रपटातही आवाज दिला

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ नंतर शरद केळकर हे हिंदीतील प्रभासचा आवाजच बनले. त्यांनी नंतर ‘साहो’ आणि ‘आदिपुरुष’ सारख्या चित्रपटात प्रभासला आवाज दिला, मात्र हे चित्रपट जास्त चालले नाहीत. मात्र, शरद केळकर यांनी दमदार डायलॉग डिलिव्हरीने प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला भाग पाडले. याशिवाय हीट चित्रपट ‘सालार’ मध्ये देखील प्रभासची हिंदी डबिंग शरद केळकर यांनी केली होती.

 

Follow Us