AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan Firing Case: सलमानच्या हत्येसाठी आले होते.. हल्लेखोर, कोर्टात बॉडीगार्डने दिली साक्ष..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील गोळीबार प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी दोन वर्षांनी मुंबईत एका कोर्टात सुरु झाली आहे. पहिला साक्षीदार म्हणून सलमान खान याच्या अंगरक्षकाने आपली साक्ष नोंदवली आहे.

Salman Khan Firing Case: सलमानच्या हत्येसाठी आले होते.. हल्लेखोर, कोर्टात बॉडीगार्डने दिली साक्ष..
Salman Khan Firing Case
| Updated on: May 03, 2026 | 8:17 PM
Share

Salman Khan Firing Case: सुमारे दोन वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटवर फायरिंग केली होती. या प्रकरणात आता सलमान खान याचा खाजगी बॉडीगार्डने मुंबईतील एका स्पेशल कोर्टात साक्ष दिली आहे. सलमान खानच्या बॉडीगार्डने आपल्या जबानीत सांगितले की हा हल्ला सलमान खान याची हत्या करण्याचा प्रयत्न होता. सलमान खान फायरिंग प्रकरणात गेल्या महिन्यातच ट्रायल सुरु झाली आहे. सलमान खान याच्या बॉडीगार्डने पहिला साक्षीदार म्हणून आपली जबानी दिली आहे.

14 एप्रिल 2024 रोजी बाईकस्वार दोघा जणांनी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर फायरिंग केली होती. बॉडीगार्ड आणि या प्रकरणातील तक्रारदाराने गेल्या महिन्यात साक्ष दिली. बॉडीगार्डाने कोर्टात सांगितले की १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता तो आपल्या नाईट ड्यूटीसाठी पोहचला होता. त्याने कोर्टाला सांगितले की गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून मिळत असलेल्या धमक्यांमुळे त्यावेळी सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

फटाख्यांसारखा आवाज ऐकला

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार बॉडीगार्डने कोर्टाला सांगितले की १४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे चार वाजता, सुरक्षा दलाने फटाख्यांसारखा आवाज ऐकला होता. साक्षीदाराने सांगितले की मी सीसीटीव्ही स्क्रीनवर पाहिले. मी पाहिले दोन लोक मोटरसायकलवर सवार होते, त्यांनी हेल्मेट परिधान केले होते, आणि इमारतीच्या दिशेने गोळीबार करत होते.

त्यांनी सांगितले यावेळी हल्लेखोरांनी ४ ते ५ राऊंड फायरिंग केली. त्यांनी सांगितले की,’ यामुळे आपण स्वत: आणि जे गार्ड तेथे हजर होते.आम्ही लागलीच मेन गेटने बाहेर पडलो.’ त्यांनी सांगितले की गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर आय लव्ह बांद्रा पॉईंटच्या दिशेने पळाले. आणि त्यानंतर ते मेहमूब स्टुडिओ रोडच्या दिशने गेले.

जीवे मारण्यासाठी झाला होता हल्ला

या दरम्यान बॉडगार्डने कोर्टात हे देखील सांगितले की जेव्हा गॅलक्सी अपार्टमेंटवर फायरिंग झाली तेव्हा सलमान खान पहिल्या मजल्यावर स्थित आपल्या बेडरुममध्ये होता. या दरम्यान बॉडीगार्डने दावा केला की, ‘गोळीबार अभिनेत्याला जीवेमारण्याचा प्रयत्न होता.’

सरकारी पक्षाचे वकील महेश मुळे यांनी कोर्टाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले, ज्यात बाईकने हल्लेखोर मेनगेटवर येताना दिसत आहेत. उलट तपासणीच्या वेळी बचाव पक्षाचे वकील विरल बब्बर यांच्या प्रश्नावर बॉडीगार्डने कन्फर्म सांगितले की जेव्हा गोळ्यांचा आवाज झाला तेव्हा ते सिक्युरिटी केबिनमध्ये होते.

या प्रकरणाती एक अन्य साक्षीदार जे एक पोलिस गार्ड आहे. त्याने कोर्टात शनिवारी सांगितले तो लॉबीत बसला होता आणि त्याने घटना घडताना पाहिली नाही आणि त्याने सांगितले की आपण घटनास्थळी गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या पडलेल्या पाहिल्या.

पाच आरोपी तुरुंगात, एकाने दिला जीव

हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी बाईकवर येऊन अभिनेता सलमान खान याच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर फायरिंग केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मते मोहम्मद रफीक सरदार चौधरी याने घटनेच्या दोन दिवस आधी सलमानच्या अपार्टमेंटची रेकी केली होती. त्याने त्या जागेचा व्हिडीओही शूट केला होता. या व्हिडीओला या गुन्ह्यात वॉटेंड आरोपी आहे त्या अनमोल बिश्नोई याला पाठवले होते. या प्रकरणात विकी गुप्ता आणि सागर पाल याशिवाय अन्य आरोपी सोनू कुमार बिश्नोई, मुहम्मद रफीक सरदार चौधरी आणि हरपाल सिंह हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

अनुज कुमार थापन नावाच्या एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. या केसमध्ये तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांना वॉण्टेड आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.

Follow Us
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा