
शेफाली जरीवालाचा 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी 27 जून रोजी तिचा मृत्यू ओढावला. मुंबई पोलिसांनुसार, शेफालीच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर पती पराग त्यागीने तिला मल्टिस्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासल्यानंतर डॉक्टर्सने शेफालीला मयत घोषीत केले. पण या ॲक्टर्सच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान पारस छाबडा याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो शेफालीच्या जन्मकुंडलीवरून तिचा अचानक मृत्यू होईल, असे संकेत देत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ग्रहांचे गणित आणि कुंडलीतील त्यांच्या बैठकीचा उल्लेख आहे.
शेफालीच्या मृत्यूविषयी पारस छाबडाची काय भविष्यवाणी
ऑगस्ट 2024 मध्ये शेफाली ही पारस छाबडा याचा पॉडकास्ट, आबरा का डाबरा मध्ये दिसली होती. त्यापूर्वी हे दोघे पण रिॲलिटी शो ‘बिग बॉस 13′ मध्ये दिसले होते. या शोमध्ये पारस याने त्याच्या कुंडलीविषयी एक धक्कादायक ज्योतिषी खुलासा केला होता. “तुझ्या 8 व्या घरात चंद्र, बुध आणि केतू विराजमान आहे. चंद्र आणि केतूचा संयोग हा सर्वात वाईट असतो. 8 वे घर हे हानी, अचानक मृत्यू, रहस्य, प्रसिद्ध लोप पावण्याचे संकेत देतो. तुझ्यासाठी चंद्र आणि केतू तर वाईट आहेतच तर या बैठकीत बुध ग्रह पण बैठक मारून बसला आहे. हा चिंता आणि अडचणीकडे इंगित करतो, इशारा करतो“, असे भाकीत छाबडाने वर्तवले होते.
पारसा छाबडा ने वाहिली श्रद्धांजली
पारस छाबडा आणि शेफाली हे बिग बॉस 13 मध्ये एकत्र होते. शेफालीचा पती पराग त्यागी हा त्याचा मित्र आहे. त्यामुळे तो शेफालीला या शो मध्ये भाभी म्हणून हाक मारत होता. शेफालीच्या मृत्यूनंतर पारस याने तीव्र शोक व्यक्त केला. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट पण शेअर केली. त्यात त्याने लिहिले आहे की, कोणाचे आयुष्य किती लिहिल्या गेले आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. ओम शांती.
शेफाली, करिअरच्या सुरुवाताली कांटा लगा या गाण्यामुळे एकदम प्रसिद्ध झाली. तिने लोकप्रियता मिळवली. तिला कांटा लगा गर्ल म्हणून ओळख मिळाली. याशिवाय शेफाली 2004 मध्ये मुझसे शादी करोगी या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसली. या चित्रपटात ती सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रासोबत दिसली.