24 तासांसाठी प्रसिद्ध अभिनेता BJP मध्ये सामील झाला, अन् आता थेट मोंदीवरच टिका केली, म्हणाला, ते इतके कमकुवत की…

Shekhar Suman On PM Modi: शेखर सुमन त्यांच्या 'शेखर टुनाईट' या नवीन शोमुळे चर्चेत आहेत, ज्यावर टीकाकारांकडून टीका होत आहे. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केैली आहे.

24 तासांसाठी प्रसिद्ध अभिनेता BJP मध्ये सामील झाला, अन् आता थेट मोंदीवरच टिका केली, म्हणाला, ते इतके कमकुवत की...
| Updated on: Oct 14, 2026 | 8:16 AM

Shekhar Suman On Modi: शेखर सुमन सध्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सुरू केलेल्या ‘शेखर टुनाईट’ या नवीन शोमुळे चर्चेत आहेत. आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेखर सुमन यांनी या शोमध्येही आपली तीच प्रतिमा जपली आहे. शेखर यांनी आपल्या शोमध्ये नेहमीच राजकीय आणि सरकारी मुद्द्यांवर विनोद केले आहेत. अलीकडेच, ते जाणूनबुजून भाजप सरकारला लक्ष्य करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता शेखर सुमन यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत, शेखर सुमन यांनी स्पष्ट केले की, निर्माते धर्मेश शंगानी यांच्यावरील धाड आणि माझा शोचा काही संबंधच नाहीये, माझ्या शोचा उद्देश कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर टीका करणे नाही. माझ्या शोच्या माध्यमातून मी व्यवस्थेतील उणिवा आणि त्रुटी उघड करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या शोमुळे पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारला कोणतीही अडचण निर्माण व्हावी असे मला तरी वाटत नाही. मी अनेक वर्षांपासून राजकीय विनोद करत आहेत. लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत, शेखर सुमन यांनी पंतप्रधान मोदींची तुलना वर्गातील मॉनिटरशी केली आणि म्हटले, “जर मॉनिटरने चूक केली, तर विद्यार्थी घाबरतील आणि त्यालाच दोष देतील, बरोबर? मॉनिटर कोणीही असो, काही फरक पडत नाही.”

Loading...

शेखर सुमन यांनी यापूर्वी १९९७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झालेल्या त्यांच्या ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ या शोमधून राजकारण आणि राजकारण्यांवर व्यंग केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कधीही कोणत्याही विशिष्ट पक्षावर किंवा नेत्यावर भाष्य केलेले नाही. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे आम्ही पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर व्यंग करायचो, त्याचप्रमाणे आम्ही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही व्यंग करायचो. आम्ही कोणत्याही व्यक्तीवर किंवा सरकारवर भाष्य करत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर करतो. जर तुम्ही व्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी कोणाला निवडून दिले असेल आणि जर ते चुकीच्या मार्गावर गेले, तर तुम्ही त्यांना ते जाणवून दिले पाहिजे. म्हणूनच हे कोणाच्याही विरोधात नाही; आम्ही फक्त लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि त्यांचा आवाज उठवत आहोत. उद्या जेव्हा कोणी दुसरे सत्तेत असेल, तेव्हाही आम्ही तेच करू.”

शेखर सुमन यांनी पुढे सांगितले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांचाही मनापासून आदर करतात, पण जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा टीका करणे योग्य आहे, असे मला वाटते. मोदींवर टीका करणारे सोशल मीडिया व्हिडिओ कथितरित्या हटवल्याबद्दल व्यक्त झालेल्या चिंतेच्या संदर्भात सुमन म्हणाले, “असे घडते. यासाठी एका व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही, पण व्यवस्थेत काहीतरी चूक आहे. जे नेतृत्व करत आहेत ते केवळ चेहरे आहेत. पण उत्तरदायित्व असलेच पाहिजे. मला नाही वाटत की पंतप्रधान मोदी इतके कमजोर आहेत की ते माझ्या एवढ्या छोट्या कार्यक्रमावरुन ते मला उचलतील. एक खूप शक्तिशाली व्यक्ती आहेत, जगात अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्याकडे त्यांचे लक्ष देणे आवश्यक आहे. ‘शेखर टुनाईट’च्या पलीकडेही जगात इतर समस्या आहेत. पंतप्रधानांना टीका आवडते असे म्हटल्यामुळे मी हा शो सुरू केला. २०२४ मध्ये शेखर सुमन केला. मात्र २४ तासांतच त्यांनी त्या पक्षामधून काढता पाय घेतला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us