शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट एकदम भारी, दिवसाची कमाई 2-3 कोटी? सत्य आले समोर

Bastian Earning : शिल्पा शेट्टीचे मुंबईतील बास्टियन हे आलिशान रेस्टॉरंट दररोज सुमारे 2-3 कोटी रुपये कमावते अशी माहिती समोर आली होती. आता बास्टियनचे सह-मालक रणजित बिंद्रा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट एकदम भारी, दिवसाची कमाई 2-3 कोटी? सत्य आले समोर
Shilpa Shetty Restaurant
Image Credit source: Google
| Updated on: Feb 25, 2026 | 9:57 PM

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मुंबईतील बास्टियन हे आलिशान रेस्टॉरंट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिल्पा या रेस्टॉरंटमधून दररोज सुमारे 2-3 कोटी रुपये कमावते अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी या रेस्टॉरंटला कुबेराचा खजिना असे म्हटले होते. लोक लॅम्बोर्गिनीसारख्या महागड्या गाड्यांमध्ये या रेस्टॉरंटमध्ये येतात. तसेच ग्राहकांच्या टेबलांवर लाखोंचे बिल येते अशी माहिती समोर आली होती. मात्र आता बास्टियनचे सह-मालक रणजित बिंद्रा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

रेस्टॉरंट किती कमावते?

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये बास्टियन ब्रँडचे सह-मालक रणजित यांच्यासोबत पार्टनरशिप केली होती. रणजित यांचा या रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के हिस्सा आहे. कर्ली टेल्स सोबतच्या संभाषणात रणजित यांनी रेस्टॉरंटच्या उत्पन्नाबद्दल माहिती विचारण्यात आली होती. रेस्टॉरंट खरोखरच दररोज 2-3 कोटी रुपये कमावते का? यावर उत्तर देताना रणजित म्हणाले की, ‘कदाचित ही माहिती सत्य असायला हवी होती. पण मला खात्री आहे की हे एक दिवस खरे होईल.’

लेखिका शोभा डे यांनी बास्टियन 2-3 कोटी रुपये कमवत असल्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दररोज 2-3 कोटी रुपये आणि वीकेंडला 3 कोटी रुपयांची उलाढाल होते. मी स्वतः रेस्टॉरंट पाहण्यासाठी गेले होते. मात्र आता रेस्टॉरंटच्या सह-मालकांनी शोभा डे यांचे सर्व दावे खोडून काढले आहेत.

शिल्पा आणि रणजीत पार्टनर का बनले?

रणजीत बिंद्रा यांनी शिल्पा शेट्टीला रेस्टॉरंटमध्ये पार्टनर का बनवले याची माहितीही समोर आली आहे. रणजीत म्हणाले की, ‘शिल्पा पार्टनर बनल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा संचारली. तिच्याशी बोलल्यावर नेहमीच सकारात्मक वातावरण निर्माण होते. मला नेहमीच शिल्पाने बास्टियनचा भाग व्हावे असे वाटत होते. ती माझी लकी चार्म होती. शिल्पा तिची भूमिका उत्तमरित्या बजावते. तिचे इनपुट नेहमीच महत्त्वाचे असतात. ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे; ती जे काही बोलते ते मी ऐकतो.’