“हा अंधविश्वास म्हणा किंवा…” साईदर्शनावेळी शक्यतो गुलाबी ड्रेसच का? शिर्डीत आलेल्या शिल्पा शेट्टीने सांगितलं खरं कारण 

शिल्पा शेट्टीने नुकतेचं कुटुंबासह शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतलं आहे. शिल्पाने साईबाबाबद्दलचा अढळ विश्वासही व्यक्त केला. तसेच ती शिर्डीला साईदर्शनासाठी येताना शक्यतो गुलाबी रंगाचे कपडे का परिधान करते, याचं खास कनेक्शन काय आहे याबद्दलही तिने सांगितलं आहे.

हा अंधविश्वास म्हणा किंवा... साईदर्शनावेळी शक्यतो गुलाबी ड्रेसच का? शिर्डीत आलेल्या शिल्पा शेट्टीने सांगितलं खरं कारण 
Shilpa Shetty Sai Baba mandir shirdi
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 21, 2025 | 2:44 PM

फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी जेवढी ग्लॅमरस आहे तेवढीच ती अध्यातमिकही आहे. शिल्पा साईबाबांना खूप मानते. ती बऱ्याचदा कुटुंबियांसोबत साईदर्शनासाठी गेलेली पाहायला मिळते.  आताही ती नुकतीच तिच्या कुटुंबासह शिर्डीला साई मंदिरात जाऊन बाबांचं दर्शन घेतलं आहे. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटोही शेअर केले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान यावेळी तिने साईबाबांवरचा तिचा विश्वास, तिची श्रद्धा याबद्दल सांगितलं आहे.

 साईंवर एवढी श्रद्धा असण्याचं खास कारण?

जेव्हा तिला तिच्या भक्तीवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, “वर्षातून एकदा मी इथे आवर्जुन येते. साईबाबांचं बोलावणं यावेळी खूप वेळानंतर आलंय. मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत इथे आली आहे, याचा मला आनंद आहे. जेव्हा मी इथे येते तेव्हा मला वाटतं मी पुन्हा माझ्या घरी आले आहे. मी आज जे काही आहे, ते साईबाबांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. साईबाबांकडून जी शिकवण मिळाली त्या गोष्टींना फिलॉसॉफीप्रमाणे मानत मी आयुष्य जगतेय. यापुढेही जगेल. फक्त श्रद्धा आणि सबूरी ठेवा. जे तुमच्या मनाप्रमाणे घडेल ते चांगलं, नाही घडलं तरीही चांगलं. फक्त बाबांवर विश्वास ठेवा की, ते जे काही करतील चांगल्यासाठी करतील.” असं म्हणत साईंवर तिची श्रद्धा किती आहे आणि का याबद्दल ती भरभरून बोलली.

शिर्डीत साईंच्या दर्शनाला येताना शक्यतो आवर्जून गुलाबी ड्रेसच का?

दरम्यान शिल्पा शिर्डीत साईंच्या दर्शनाला येताना शक्यतो आवर्जून गुलाबी, लाल रंगाचाच ड्रेस घालते. तिला याबद्दलही विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, “राणी माझा अत्यंत आवडता रंग आहे. मी जेव्हा इथे येते तेव्हा साईबाबांसाठी तयार होऊन येते. आम्ही आज थकून आलोय कारण आम्ही शनी-शिंगणापूरमधून आलोय. खूप मोठा प्रवास केलाय. पण बाबा शक्ती देतात. माझी आईही इतक्या दूर प्रवास करुन आली आहे, ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पैशांच्या पलीकडे खूप गोष्टी आहेत मुख्य म्हणजे सुख-शांती-समाधान बाबांनी दिलंय. याविषयी अंधविश्वास आहे की दृढविश्वास नाही,  माहित नाही परंतु जे होतं ते चांगल्यासाठी होतं, यावर माझं ठाम विश्वास आहे. शेवटी सर्व चांगलंच होतं, यावर माझा विश्वास आहे.” अशाप्रकारे शिल्पाने तिचं मत व्यक्त केलंय.


शिल्पा बाबांच्या भक्तीत मग्न असल्याचे दिसून आले.

शिल्पाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी साईबाबांच्या भक्तीत मग्न असल्याचे दिसून येत आहे. तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा, मुलगी आणि आई देखील उपस्थित असल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘शांती, आशीर्वाद आणि सुरक्षिततेत.. ओम साई राम.’ तिच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आतापर्यंत हजारो लाईक्स आले आहेत.

ती पारंपारिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

शिल्पाने घातलेला गुलाबी रंगाचा सूट ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिने हलका मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत होती. त्याचवेळी, राज कुंद्रा पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसला आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. सर्वजण भक्तिभावाने साईबाबांची पूजा करताना दिसले.