‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक

झलक दिखला जा 11 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. झलक दिखला जा 11 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. मात्र, झलक दिखला जा 11 च्या विरोधात लोकांचा संताप हा वाढताना दिसतोय. हेच नाही तर जोरदार टीका केली जात आहे. एक निर्णय शोच्या निर्मात्यांना महागात पडल्याची शक्यता आहे.

झलक दिखला जा 11वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक
| Updated on: Feb 26, 2024 | 11:51 AM

मुंबई : डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा 11 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. शो आता अंतिम टप्प्यात आहे. शोच्या ग्रँड फिनालेची चाहते सतत वाट पाहताना दिसत आहेत. शोला टॉप 5 स्पर्धेक देखील मिळाले आहेत. मात्र, आता अचानक असे काही घडले की, ‘रिॲलिटी शो झलक दिखला जा’च्या निर्मात्यांना लोक खडेबोल हे सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर लोकांचा संताप हा वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर झलक दिखला जा 11 ला लोक ट्रोल करताना दिसत आहेत. एक निर्णय आता झलक दिखला जा 11 च्या निर्मात्यांना महागात पडताना दिसतंय.

झलक दिखला जा 11 मध्ये असे काही घडले की, ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हैराण करणारे म्हणजे शोच्या फायनलपूर्वीच शिव ठाकरेला शोमधून बाहेर काढण्यात आलंय. शिव ठाकरे याच्या एलिमिनेशनमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि शोच्या विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट ही बघायला मिळत आहे. लोक हैराण झाले आहेत.

झलक दिखला जा 11 च्या निर्मात्यांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप हा केला जातोय. एकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, अरे इथे किती जास्त पक्षपातीपणा सुरू आहे. दुसऱ्याने लिहिले की, या शोमध्ये किती जास्त मोठे राजकारण सुरू आहे, खरोखरच हे खूप जास्त घाण प्रकार सुरू आहे आणि कुठेतरी थांबवायला हवे.

तिसऱ्याने लिहिले की, बिग बाॅसमध्येही याच्यासोबतच असे घडले. अजून एकाने कमेंट करत लिहिले की, खरोखरच हा खूप जास्त चुकीचा प्रकार आहे, नेहमी मराठी माणसावरच का अन्याय होतो. अजून एकाने लिहिले की, या शोचा फिनालेच मी बघणार नाहीये. आता या शोवर बहिष्कार टाकणार आहे.

शिव ठाकरे हा झलक दिखला जा 11 मधून बाहेर पडल्यानंतर मोठा संताप व्यक्त केला जातोय. कारण झलक दिखला जा 11 मध्ये धमाकेदार डान्स करताना शिव ठाकरे दिसला. मात्र, असे असतानाही ऐन फिनालेला काही दिवस शिल्लक असतानाच त्याला बाहेरचला रस्ता दाखवण्यात आला. शिव ठाकरे याचे चाहते हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.