AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काउंटडाऊन सुरु, मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाच्या लॉटरीची तारीख ठरली

मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून २५०० घरांसाठी एप्रिल २०२६ मध्ये लॉटरी काढली जाणार असून, मार्चअखेर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. मागाठाणे, विक्रोळी आणि प्रतीक्षा नगर यांसारख्या भागांतील घरांचा यात समावेश असेल.

काउंटडाऊन सुरु, मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाच्या लॉटरीची तारीख ठरली
mumbai home mhada
| Updated on: Mar 13, 2026 | 7:35 AM
Share

स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत स्वतःच्या मालकीचे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाच्या वतीने तब्बल २५०० घरांसाठी विशेष लॉटरी काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर एप्रिलमध्ये या घरांची सोडत काढली जाणार आहे.

मार्चअखेर जाहिरात, एप्रिलमध्ये सोडत

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. या लॉटरीसाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. अर्जांच्या छाननीनंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस घरांची संगणकीय सोडत (Lottery) जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार, यावेळीच्या लॉटरीमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मागाठाणे (बोरिवली), प्रतीक्षा नगर (सायन), विक्रोळी या ठिकाणचा समावेश असणार आहे. यासोबतच मुंबईतील इतर उपनगरांमधील विविध उत्पन्न गटांतील (EWS, LIG, MIG, HIG) घरांचा यात समावेश असेल.

पत्राचाळीतील घरांचा सध्यातरी समावेश नाही

मुंबई मंडळाकडून सुरुवातीला ५००० घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन होते. मात्र, गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर (पत्रा चाळ) प्रकल्पातील सुमारे २५०० घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होण्यासाठी पुढील वर्षाचा अखेर उजाडू शकतो. त्यामुळे अर्जदारांचा हिरमोड होऊ नये आणि ताबा मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी म्हाडाने या लॉटरीत केवळ तयार घरांचाच समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्प दरात घर घेण्याची संधी

खाजगी विकासकांच्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असताना, म्हाडाची घरे आजही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असतात. त्यामुळे या लॉटरीकडे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मुंबईत घर घ्यायचे आहे, त्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहनही अप्रत्यक्षपणे या घडामोडींतून करण्यात आले आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान