AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor : लावणी शिकण्यासाठी मेहनत अन् अपघात…श्रद्धा कपूरनं उलगडला ‘ईठा’ सिनेमाचा प्रवास

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरचा 'ईठा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अपघात झालेल्या. याबद्दल तिनं सांगितलं आहे.

Shraddha Kapoor : लावणी शिकण्यासाठी मेहनत अन् अपघात...श्रद्धा कपूरनं उलगडला 'ईठा' सिनेमाचा प्रवास
| Updated on: Oct 30, 2026 | 8:25 PM
Share

श्रद्धा कपूर ‘ईठा’ या चित्रपटात लावणी नृत्यांगनेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनापासून प्रेरित आहे. शुक्रवारी मुंबईतील दादर येथील प्लाझा सिनेमात आयोजित एका विशेष कार्यक्रमात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

भूमिकेच्या तयारीबद्दल श्रद्धा कपूर

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ट्रेलर लाँचच्या वेळी श्रद्धानं ‘ईठा’ ही भूमिका साकारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, या प्रक्रियेदरम्यान तिला अनेक रंजक व्यक्ती भेटल्या आणि एका अशा सांस्कृतिक विश्वाचा परिचय झाला, जे तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होते. मात्र, या तयारीदरम्यान तिला शारीरिक दुखापतही सहन करावी लागली.

शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल बोलताना श्रद्धा म्हणाली, ‘मला खूप रंजक माणसं भेटली. मी एका पूर्णपणे वेगळ्या विश्वात प्रवेश केला. शूटिंगदरम्यान डान्स करताना एक अपघातही घडला, माझे स्नायू फाटले. पण संपूर्ण टीमनं मला खूप पाठिंबा दिला. त्यांचं प्रेम आणि काळजीमुळे आम्ही शुटिंगमुळे थांबवलं होतं, ज्यामुळे मी पुन्हा बरी होऊन काम सुरू करू शकले. मला लावणी समजून घेण्यासाठी खूप सराव करावा लागला.’

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं की, या पारंपरिक नृत्य प्रकाराचं शूटिंग करण्यासाठी त्यांच्या टीमनं विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक आठवड्याचा सराव केला. लक्ष्मण उतेकर म्हणाले, ‘आम्ही ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर यांना आमच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्यांच्यासोबत आम्ही एक आठवडा सराव केला, ज्याचा उद्देश लावणीतील ‘अदा’ आणि ‘नजाकत’ समजून घेणं हा होता.’

सिनेमा तयार करताना विठाबाईंच्या कुटुंबाची परवानगी घेतली का? असं विचारलं असता लक्ष्मण उतेकर म्हणाले की, ‘ईठा’ हा विठाबाईंवरील थेट चरित्रपट नाही. हा चित्रपट ‘तमाशा: विठाबाईंच्या आयुष्याची’ या पुस्तकात नोंदवलेल्या काही घटनांपासून प्रेरित आहे. श्रद्धा म्हणाली की, ‘सरांनी म्हटल्याप्रमाणे, ही केवळ विठाबाईंची गोष्ट नाही. ही त्या सर्व तमाशा कलाकारांची, अशा हजारो कलाकारांची गोष्ट आहे.’

कोण होत्या विठाबाई नारायणगावकर ?

१९३५ मध्ये पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाई लोककलाकारांच्या कुटुंबातून आल्या होत्या आणि त्यांनी अगदी लहान वयातच नृत्य करायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणी परंपरेतील त्या अत्यंत प्रसिद्ध नावांपैकी एक बनल्या.

दरम्यान, ‘ईठा’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा यांनी ‘मॅडॉक फिल्म्स’ आणि ‘कठपुतली क्रिएशन्स’ अंतर्गत केली आहे. ‘लुका छुप्पी’, ‘मिमी’, ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘छावा’ नंतर, या चित्रपटामुळे लक्ष्मण उतेकर पुन्हा एकदा ‘मॅडॉक फिल्म्स’सोबत काम करत आहेत. या सिनेमामध्ये श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, मोहम्मद झीशान अय्युब, नाना पाटेकर, सिद्धार्थ जाधव, अनंत जोशी, अक्षरा सिंग आणि उल्का गुप्ता यांचा समावेश आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं असून हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान