मुंबई हादरली! रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार, मोठी खळबळ, तब्बल चार…

Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई हादरली! रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार, मोठी खळबळ, तब्बल चार...
Rohit Shetty
| Updated on: Feb 01, 2026 | 7:42 AM

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबाराची घटना घडलीये, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळाची चौकशी करत आहेत. या घटनेने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. फक्त गोळीबारच नाही तर त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याचीही घटना उघडकीस आली. मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक केली. या घटनेला काही दिवस उलटले असतानाच आता रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. मात्र, रोहित शेट्टी याच्या घराबाहेर नक्की कोणी गोळीबार केला? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोहित शेट्टी याच्या शेट्टी टॉवर्स या इमारतीवर हा गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांचे क्राइम ब्रँच पथक व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास सुरू आहे. शेट्टी टॉवर्स बाहेर अज्ञातने चार राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. एक दोन नाही तर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने चार राऊंड फायर केली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.

पोलिसांकडून या घटनेची चाैकशी केली जात असून सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. मात्र, इतकी मोठी चूक नक्की कशी झाली याचा तपास केला जात आहे. मुंबईमध्ये जवळपास बॉलिवूड कलाकार राहतात, त्यामुळे सर्वचजण या गोळीबाराच्या घटनेने तणावात आहेत. रोहित शेट्टी याचे घर जुहूमध्ये आहे. हा मुंबईतील महागडा परिसर आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रोहित शेट्टी याच घरात राहतो. रोहित शेट्टीला कोणी यापूर्वी धमकी दिली का?  याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनंतर रोहित शेट्टी याच्या घराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे सांगितले जात आहे.