
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जर कोणता चित्रपट अमर झाला असेल, तर तो ‘शोले’ आहे. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्यांसाठी फक्त एक चित्रपट नसून, ती एक भावना आहे. जय-वीरूच्या मैत्रीचं उदाहरण असो, बसंतीचा डायलॉग असो, गब्बर सिंगची क्रूरता असो किंवा ठाकूरचा सूड असो.. ‘शोले’मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. सलीम-जावेद यांनी लिहिलेले संवाद आणि रमेश सिप्पी यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट आज 50 वर्षांनंतरही प्रेक्षक त्याच उत्साहाने पाहतात. अनेकांना या क्लासिक चित्रपटाबद्दलची प्रत्येक गोष्ट माहीत असल्याचं वाटतं. परंतु ‘शोले’च्या पडद्यामागील काही रंजक गोष्टी फार क्वचित लोकांना ठाऊक असतील. 1- गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमजद खान पहिली पसंत नव्हते ‘शोले’ चित्रपटातील हिरो जितके चर्चेत होते, तितकीच चर्चा त्यातील व्हिलनचीही झाली. ‘गब्बर सिंग’ हा भयानक खलनायक अभिनेता अमजद खान यांनी साकारली होती. पण फार कमी लोकांना माहीत असेल की अमजद...