
मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि लिन लॅशराम (Lin Laishram) यांनी मोठ्या थाटत लग्न केलं आहे. आता लवकरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) देखील लग्न करणार आहे. रकुल हिच्या अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील लग्ना करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खुद्द श्रद्धा हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, श्रद्धा कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता श्रद्धा हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. पण सोशल मीडियावर स्वतःचे हटके फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. ज्यामुळे श्रद्ध लवकरच लग्न करणार अशी चर्चा रंगली आहे.
श्रद्धा हिने पारंपरिक लूकमध्ये काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘चांगली दिसत आहे, लग्न करु का?’ असं लिहिलं आहे. फक्त एका कॅप्शनमुळे अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
श्रद्धा हिच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आदित्य रॉय कपूर याच्यासोबत लग्न कर….’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू फक्त सुंदर नाही तर, स्वर्गातून खाली आलेली अप्सरा वाटत आहेस…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टनंतर चाहते देखील श्रद्धा हिच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.
श्रद्धा हिने ‘आशिकी 2’ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं, त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. श्रद्धा हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्क केलं आहे. श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील श्रद्धा कायम सक्रिय असते.
श्रद्धा कपूर हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘स्त्री 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. श्रद्धा हिचा ‘चंदू चॅंपियन’ सिनेमात देखील चर्चेत आहे. श्रद्धा कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.