AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते महिलांना नीच…’, ’12th फेल’ स्टारर विक्रांत मेसीने सांगितलं इंडस्ट्री सोडण्याचं कारण

Vikrant Massey On TV Industry : '12th फेल' स्टारर विक्रांत मेसी याचं धक्कादायक वक्तव्य, इंडस्ट्री सोडण्याच कारण सांगत म्हणाला, 'ते महिलांना नीच...', '12th फेल' सिनेमाच्या यशानंतर विक्रांत याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ

'ते महिलांना नीच...', '12th फेल' स्टारर विक्रांत मेसीने सांगितलं इंडस्ट्री सोडण्याचं कारण
विक्रांत मेस्सी
| Updated on: Feb 05, 2024 | 12:01 PM
Share

मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : अभिनेता विक्रांत मेसी सध्या ’12th फेल’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ’12th फेल’ सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियेत मोठी वाढ झाली आहे. सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी विक्रांत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. पण आता अभिनेत्याने टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. शिवाय यामागचं अभिनेत्रीने कारण देखील सांगितलं आहे. शिवाय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि भुमिकांबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विक्रांत मेसी याने इंडस्ट्री सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ‘टीव्ही इंडस्ट्री सोडण्यामागे फक्त एकच कारण नाही. टीव्ही विश्वात काम करताना माझं मन रमत नव्हतं. कारण ज्या प्रकारचा कंटेंट असतो, मला आवडत नाही. मला ते काम कमी दर्जाचं वाटतं. कदाचित ही त्यांची मनोरंजनाची व्याख्या असावी. ते महिलांना नीच भूमिका देतात.’

पुढे अभिनेत्याने ‘बालिका वधू’ मालिकेबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘बालिका वधू मलिकाचा मी एक भाग होतो. मालिकेने अनेकांना प्रेरणा दिली आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की या मालिकेने महिलांची सुरक्षा आणि मुलींच्या शिक्षणासाठी खूप योगदान दिलं. अशा प्रकारचा कंटेंट केल्यानंतर माझे निर्मात्यांशी खूप भांडण झाले आणि मी काही शो सोडले.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

विक्रांत मेसी याच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने ‘बालिका वधू’, ‘धरम वीर’ आणि ‘बाबा ऐसो वर ढूंढो’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय अभिनेत्याचा ’12th फेल’ सिनेमा चाहत्यांनी डोक्यावर घेतला. चित्रपगृहात देखील सिनेमाने तगडी कमाई केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमा लोकप्रिय ठरत आहे.

विक्रांत मेसी याचे आगामी सिनेमे

’12th फेल’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या विक्रांत याच्या आगामी सिनेमांकडे चाहत्यांचं लक्ष आहे. विक्रांत आता सेक्शन 36′ आणि ‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र फत्त आणि फक्त विक्रांत मेसी याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार  मोठी आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.