Bollywood : ‘रुमचं दार बंद कर आणि…’, सुपरस्टारच्या वाईट कृत्यामुळे घाबरली अभिनेत्री

Bollywood : झगगत्या विश्वातील ग्लॅमरस बाजू कायम सर्वांना दिसते, पण बॉलिवूडची दुसरं बाजू आणि काळ सत्य लवकर समोर येत नाही... आता देखील एका अभिनेत्रीने सांगितली तिच्यासोबत घडलेली घटना, सुपरस्टारच्या वाईट कृत्यामुळे घाबरली अभिनेत्री, मुलाखतीत दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत...

Bollywood : रुमचं दार बंद कर आणि..., सुपरस्टारच्या वाईट कृत्यामुळे घाबरली अभिनेत्री
| Updated on: Oct 23, 2023 | 3:47 PM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील ग्लॅमर, प्रसिद्धी, लोकप्रियता इत्यादी गोष्टी अनेक जण आकर्षित होतात. पण बॉलिवूड दुसरी बाजू फार कमी लोकांना माहिती आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी कलाकार मेहनत घेतात कष्ट करतात. पण अनेकदा समोर अशी परिस्थिती येते ज्यामुळे मनात एक भीती निर्माण होते. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सर्वांना सांगितली आहे. सुपरस्टारच्या वाईट कृत्यामुळे घाबरलेल्या अभिनेत्रीने त्याच्या जाळ्यातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ती अपयशी ठेरली. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला किस्सा शेअर केला आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीबद्दल चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौहर खान आहे. गौहर खान अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी व्हीजे म्हणून काम करायची. तेव्हा एका दिग्दर्शकाची मुलाखत घेत असताना अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली होती. तेव्हा गौहर फक्त १८ वर्षांची होती.

अभिनेत्री म्हणाली, ‘दिग्दर्शक माझा हात बिलकूल सोडत नव्हता. अशा गोष्टी घडत होत्या ज्या माझ्यासोबत कधीच घडल्या नव्हत्या. दिग्दर्शकाने फार वेळ माझा हात पकडून ठेवला होता. मी सतत स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण माझ्याकडून ते शक्य होतच नव्हतं. पूर्ण मुलाखतीत तो माझा हात पकडून बसला होता.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तो सेलिब्रिटी फार मोठा होता आणि मी त्यांचा आदर करत होती. पण अशाप्रकारे त्याने माझा हात पकडून ठेवावा… ही गोष्ट मला बिलकूल पटत नव्हती. मी त्याला काही बोलू देखील शकत नव्हाती. कदाचित, मी त्याचा आदर करत होती, असं यामागचं कारण असेल… दिग्दर्शकाला देखील कळलं होतं की, मी स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.’

‘मुलाखत संपल्यानंतर दिग्दर्शक मला म्हणाला, रुममध्ये जा आणि दार बंद कर. त्यानंतर मला कळलं की कोणी सुपरस्टार माझा मोबाईल नंबर मागत आहे आणि तो इतरांनी सांगत होता, ती भेटून सुद्धा गेली नाही…’ सध्या सर्वत्र गौहर खान हिने सांगितलेल्या भयानक अनुभवाची चर्चा रंगत आहे.

गौहर खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मुलला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री काही काळ ब्रेक घेतला. गौहर सोशल मीडियावर देखील स्वतःचे आणि मुलाचे फोटो पोस्ट करत असते.

 

 

Follow Us