
अभिनेत्री पलक तिवारी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पलक तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

आता पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पलक एका हॉटेलमध्येबसून पोज देताना दिसत आहे. अशात फोटो कोणी क्लिक केले. असा प्रश्न चाहते विचारत आहे.

सांगायचं झालं तर, पलक हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम सोबत रंगत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

पलक कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.