Siddharth-Kiara: वरुण धवनने कियाराला किस केल्यामुळे भडकला सिद्धार्थ मल्होत्रा; व्हिडीओ व्हायरल

शूटिंगदरम्यान वरुणने कियाराला अचानक केलं किस; अभिनेत्रीलाही बसला धक्का, व्हिडीओ पाहून बॉयफ्रेंड सिद्धार्थचा राग अनावर!

Siddharth-Kiara: वरुण धवनने कियाराला किस केल्यामुळे भडकला सिद्धार्थ मल्होत्रा; व्हिडीओ व्हायरल
Siddharth-Kiara: वरुण धवनने कियाराला किस केल्यामुळे भडकला सिद्धार्थ मल्होत्रा
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 08, 2023 | 10:48 AM

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोघांचं राजस्थानमधील जैसलमेर इथं धूमधडाक्यात लग्न पार पडणार असल्याचं कळतंय. लग्नाच्या या चर्चांदरम्यान कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सिद्धार्थने कियारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच्या नाराजीचा कारण होता अभिनेता वरुण धवन.

नेमकं काय आहे प्रकरण?

वरुण धवनमुळे सिद्धार्थ त्याची गर्लफ्रेंड कियारावर खूप भडकल्याचं समजतंय. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुण आणि कियारा एका फोटोशूटसाठी पोझ देत होते. त्यावेळी अचानक वरुणने कियाराच्या गालावर किस केलं. वरुणने अचानक किस केल्याचं पाहून क्षणभरासाठी कियारासुद्धा आश्चर्यचकीत होते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दिसून येतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थने नाराजी व्यक्त केली.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सिद्धार्थ वरुणवर खूप रागावला होता. इतकंच नाही तर त्याने दिग्दर्शकांच्या सूचनेशिवाय कियाराला किस का केलं, यावरून प्रश्नही उपस्थित केला. वरुणमुळे कियारालाही सिद्धार्थच्या नाराजीचा सामना करावा लागला.

पहा व्हिडीओ

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघं येत्या 6 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.