Kiara Sidharth | कियारा-सिद्धार्थच्या लग्नाची तारीख ठरली; ‘या’ ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा

ही जोडी येत्या 6 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. हा लग्नसोहळा कुठे आणि कसा पार पडेल, याचीही माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम, लग्न आणि लग्नानंतरचं रिसेप्शन हे 5 फेब्रुवारीपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहेत.

Kiara Sidharth | कियारा-सिद्धार्थच्या लग्नाची तारीख ठरली; या ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा
कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा
| Updated on: Feb 02, 2023 | 2:59 PM

मुंबई: बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र लग्नाच्या चर्चांवर त्यांनी अधिकृतरित्या कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, ही जोडी येत्या 6 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. हा लग्नसोहळा कुठे आणि कसा पार पडेल, याचीही माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम, लग्न आणि लग्नानंतरचं रिसेप्शन हे 5 फेब्रुवारीपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहेत. या दोघांच्या विवाहस्थळाविषयीही जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. या लग्नसोहळ्यासाठी 100 ते 125 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला शाहरुख खान ते करण जोहरपर्यंत बरेच सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं समजतंय. या शाही विवाहसोहळ्यासाठी दोघांनी जवळपास 84 आलिशान रुम्स बुक केल्याचंही कळतंय. या रुम्सचं भाडं जवळपास एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे लग्नाला हजेरी लावणाऱ्या खास पाहुण्यांसाठी 70 लग्झरी गाड्यासुद्धा बुक करण्यात आल्या आहेत.

मेहंदी, हळद आणि संगीत हे कार्यक्रम 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहेत. कियाराला नुकतंच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत पाहिलं गेलं. त्यामुळे तिच्या लग्नासाठीचे कपडे मनिष डिझाइन करणार असल्याची चर्चा आहे.

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.