Alia Bhatt हिच्या ‘या’ गोष्टीच्या आठवणी आजही एक्स बॉयफ्रेंड, म्हणतो…

अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींसोबत आलिया भट्टच्या नावाची चर्चा; अभिनेत्रीच्या 'या' गोष्टीच्या आठवणीत एक्स बॉयफ्रेंड म्हणतो...

Alia Bhatt हिच्या या गोष्टीच्या आठवणी आजही एक्स बॉयफ्रेंड, म्हणतो...
| Updated on: Mar 15, 2023 | 1:45 PM

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने ‘गंगुबाई’ ही भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आज अभिनेत्री यशाच्या उच्च शिखरावर असली तरी, तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. महत्त्वाचं म्हणजे आज आलिया अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत सुखी आणि आनंदी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींसोबत आलिया भट्टच्या नावाची चर्चा रंगली. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा.

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र आलिया आणि सिद्धार्थ यांच्या नावाची चर्चा होती. अनेक ठिकाणी एकमेकांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. दरम्यान दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल पोहोचले होते. तेव्हा दोघांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

चॅट शोमध्ये करण याने सिद्धार्थला विचारलं, ‘एक्स गर्लफ्रेंडची कोणती गोष्ट तुला सर्वात जास्त आवडते..’ करणच्या प्रश्नाचं उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, ‘मला माझ्या एक्स गर्लफ्रेंडची मांजर फार आवडते.’ आलियाला मांजर प्रचंड आवडतात ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. अभिनेत्री कायम मांजरीसोबत फोटो पोस्ट करत असते.

२०१९ मध्ये आलियाने सिद्धार्थ याच्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘सिडसाठी माझ्या मनात प्रेम आणि आदर आहे. आम्ही दोघांनी इंडस्ट्रीमध्ये एकत्र पदार्पण केलं. मी गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थला ओळखते. आमच्या दोघांमध्ये एक इतिहास आहे.’ सांगायचं झालं तर सिद्धार्थ आणि आलिया ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

करणच्या शोमध्ये सिद्धार्थने आलियासोबत असलेल्या नात्यावर अनेक खुलासे केले. अभिनेता म्हणाला, ‘आलिया आणि मी वाईन पिवून विकी कौशल याला फोन केला होता. आम्ही तेव्हा चांदण्या मोजत होतो आणि कोणाला फोन करायचा असा विचार करत विकीला फोन केला होता…’ असं देखील सिद्धार्थ म्हणाला.

पूर्वी आलिया आणि सिद्धार्थ यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगायची. पण आता दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहे. आलियाने रणबीरसोबत लग्न केलं असून तिला एक गोंडस मुलगी देखील आहे. तर सिद्धार्थने ७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री किआरा अडवाणी हिच्यासोबत लग्न केलं.