बुटांनी मारलं… पैसे घर हिसकावून घेतलं… रडत गायिकेकडून वकिलावर गंभीर आरोप, धक्कादायक व्हिडीओ समोर

गायिकेसोबत घडलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर, वकिलाने तिला पहलवानासारखं मारलं, पैसे घर हिसकावून घेतलं आणि..., अनेक वर्षांनंतर चार भिंतींमधील सत्य समोर आलं...

बुटांनी मारलं... पैसे घर हिसकावून घेतलं... रडत गायिकेकडून वकिलावर गंभीर आरोप, धक्कादायक व्हिडीओ समोर
| Updated on: Aug 28, 2025 | 12:29 PM

गायिका आणि माजी रेडिओ जॉकी सुचित्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘डोले डोले’ फेम सचित्रा हिने होणारा पती आणि चेन्नई हायकोर्टाचा वकील शुनमुगराज याच्यावर गंभीर आरोप केले आहे. शुनमुगराज याने सुचित्राला हिची फक्त मारहाण केली नाही तर, तचं घर आणि पैसे देखील हिसकावून घेतले आहेत. सुचित्रा हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट घडलेली सर्व घटना सांगितली आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सुचित्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, होणारा नवरा तिला बुटांनी मारहाण करायचा. तो तिला WWE चा पहलवान असल्यासारखं मारहाण करायचा. गेल्या पाच वर्षांपासून सुचित्रा आणि शुनमुगराज एकत्र राहत आहे. दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे. पण या नात्यात गायिकेला प्रेम नाही तर, फक्त हिंसा मिळाली आहे.

व्हिडीओ पोस्ट करत संतापात सुचित्रा म्हणते, ‘या शुनमुगराज याने माझी कमाई घेतली आहे… जी मी गाणी गात मोठ्या मेहनतीने कमावली होती. गाणं गाणं फार कठीण नव्हतं, पण व्यावसायिक दृष्टिकोन राखणं, छेडछाडीकडे दुर्लक्ष करणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं हे फार कठीण होतं..

 

 

सुचित्राने आता स्पष्ट केलं आहे की, ती आता शांत बसणार नाही आणि शुनमुगराजविरुद्ध कायदेशीर कारवाई करेल. तिने इशारा दिला की, ती तिचा हक्क परत मिळवण्यासाठी प्रत्येक डिजिटल साधनाचा वापर करेल. आता ती तिचे पैसे परत मिळेपर्यंत या लढाईतून मागे हटणार नाही.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, सुचित्रा हिच्याच घरातून शुनमुगराज याने तिला बाहेर काढलं… त्यानंतर मुंबईत येवून तिला नोकरी करावी लागली. याआधी देखील सुचित्रा हिने सोशल मीडियावर हिंसा होत असल्याचे संकेत दिले होते. पण तेव्हा लगेच पोस्ट डिलिट केली. पण आता सुचित्रा हिने शुनमुगराज याचं सतत नाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.