AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याने बाप्पाची आरती करताना असं काय केलं, ज्यामुळे भडकेल चाहते, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan: हे चुकीचं आहे, भाईजानच्या चेहऱ्यावर..., बाप्पाची आरती करताना सलमान खान याने असं काय केलं ज्यामुळे नाराज झाले चाहते, व्हिडीओ सर्वत्र होतोय व्हायरल... अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

सलमान खान याने बाप्पाची आरती करताना असं काय केलं, ज्यामुळे भडकेल चाहते, व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Aug 28, 2025 | 11:22 AM
Share

Salman Khan: गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं आहे. फक्त सर्वसामान्यांच्या घरीच नाही तर, सेलिब्रिटींच्या घरी देखील गणरायाची स्थापना झाली आहे. बॉलिवूडमध्ये असं एक मुस्लिम कुटुंब आहे, जे मोठ्या भक्तीभावाने गणरायचं घरात स्वागत करतं. हे कुटुंब दुसरं तिसर कोणी नाही तर, अभिनेता सलमान खान याचं आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाईजान कुटुंबियांसोबत बाप्पाची आरती करताना दिसत आहे.

दरवर्षी प्रमाणे सलमान खान याने यंदाच्या वर्षी देखील जवळच्या व्यक्तींना आणि मित्रपरिवाराला गणरायाच्या दर्शनासाठी बोलावलं होतं. सलमान खान याची सर्वात लहान बहीण अर्पिता हिच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पंडित आरती म्हणताना दिसत आहे… तर अनेकांना आरतीचा मान घेतला.

सलमान खान याच्यापासून अरबाज खान आणि आई – वडील सलीम – सलमा यांच्यासोबत भाऊ – बहीण आणि जवळच्य मित्रांनी देखील बाप्पाची आरती केली. या उत्सवात श्रद्धा, प्रेम आणि कौटुंबिक बंधन स्पष्ट दिसून आलं. कुटुंबाने पुन्हा एकदा आरती थाळी धरून आणि भगवान गणेशाची पूजा करून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेची भावना सुंदरपणे प्रदर्शित केली.

व्हिडीओवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं तर, अभिनेकांनी टीका केली आहे. एक नेटकरी सलमान खान याच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘मुस्लिम असण्याच्या नावावर सलमान कलंक आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘फक्त नावासाठी का म्हणता मुस्लिम आहात म्हणून…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खानच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नाही…, भाईजान हे चुकीचं आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘असं नाटक करणार नाही तर दुकान चालणार नाही…’

सलमान खान याचे आगामी सिनेमे

सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत चित्रांगदा सिंग, जेन शॉ, अंकुर भाटिया आणि हर्षिल शाह देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा