Arijit Singh : यशाच्या शिखरावर असतानाच निवृत्ती का ? खुद्द अरिजीतनेच सांगितलं मोठं कारण

यावर्षी अरिजीतच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स लाइन्ड अप आहेत. मात्र आता तो कोणतेही नवे प्रोजेक्ट साइन करणार नाहीये. सोशल मीडियावर खुद्द अरिजीतनेच ही घोषणा केली. यशाच्या शिखरावर असताना, लाखो चाहते असताना अरिजतीने असा निर्णय अचानक का घेतला ? हाँच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात घोळत आहे.

Arijit Singh : यशाच्या शिखरावर असतानाच निवृत्ती का ? खुद्द अरिजीतनेच सांगितलं मोठं कारण
गायक अरिजित सिंग
| Updated on: Jan 28, 2026 | 8:15 AM

खादा आवाज असा असतो जो थेट तुमच्या हृदयात घर करतो, मग ते गाणं कोणतंही असो. भारतात अनेक नावाजलेले गायक होऊन गेले, आजही त्यांचे चाहते आहेत, पण आजच्या पिढीपासून ते लहान-मोठ्यापर्यंत सर्वांना आपलासा वाटणारा, भावणारा एक आवाज म्हणजे अरिजित सिंग. फिर ले आय दिल असो किंवा तुम ही हो, नाहीतर मग आत्ता आत्ता आलेले धरुंधरधरमधलं गेहरा हुआ हे गीत… त्याचा आवाज ऐकलं की सगळं काही थांबतं, असं वाटतं. इतका त्याचा आवाज आपल्या आत भिनतो. अरिजितच्या चाहत्यांपैकी अनेकांची हीच अवस्थ होत असेल. मात्र काल रात्री त्याने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका बातमीुळे अनेकांना फक्त धक्काच नाही बसला तर आत खोलवर काही तुटलं असं जाणवलं असेल.

शेकडो गाणी गाऊन, लाखो चाहत्यांच्या मनात घर करून, करिअरच्या टॉपवर, यशाच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या अरिजीत सिंग याने काल अचानक प्लेबॅक सिंगिंगमधून संन्यास घेण्याची घोषणा केली. ‘गहरा हुआ’, ‘घर कब आओगे’ आणि ‘मातृभूमि’या तीन गाण्यांन सध्यात्याच्या चाहत्यांच्या मनाव गारूड केलेलं असतानाच अरिजीतच्या या निर्णयामुळे सगळेच हादरले. संपूर्ण इंटस्ट्रीलाही यामुळे मोठा धक्का बसला आहे, चाहते तर हैराणच आहेत, करिअरच्या पीकवर असताना त्याने हा निर्णय का घेतला याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

अरिजितने का सोडलं प्लेबॅक सिंगिंग ?

या वर्षी अरिजीत सिंगकडे अनेक प्रोजेक्ट्स होते. मात्र आता तो कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन करत नाहीये. त्याने सोशल मीडियाद्वारे अधिकृतपणे याची घोषणा केली. सर्वात पहिले, अरिजीतने त्याच्या खाजगी एक्स अकाउंटवर आणि नंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने म्हटले की तो आता प्लेबॅक सिंगिंग करणार नाही. यानंतर, एका नवीन ट्विटमध्ये, अरिजित सिंगने या अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले.

त्यामध्ये अरिजितने प्लेबॅक सिंगिंगमधलं करिअर संपवण्याच्या निर्णयामागचं कारण उघड केलं. त्याने त्च्या प्रायव्हेट एक्स ( आधीचं ट्विटर) अकाऊंटवर लिहीलं, ‘ या निर्णयामागे काही एकच असं कारण नाही, अनेक कारणं आहेत, आणि मी बऱ्याच काळापासून हे करण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी मी हे धाडस केलं. एक कारण सोपे आहे : मला सहज कंटाळा येतो. म्हणून मी स्टेजवर वेगवेगळ्या मांडणीत तीच गाणी सादर करतो. तर गोष्ट अशी आहे की, मला कंटाळा आला होता. मला उदरनिर्वाहासाठी दुसरं काही संगीत करावं लागेल. दुसरं कारण म्हणजे नवीन गायकांना उदयास येताना पाहून मला खरी प्रेरणा मिळवायची आहे ‘ असं अरिजितीने त्यात नमूद केलंय.

चाहत्यांना धक्का

संन्यासाची घोषणा करताना अरिजीतने लिहीलेल्या पोस्टने सर्वांना मोठा धक्का बसला होता. “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षात तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. श्रोते म्हणून तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिले आहे. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मी, पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाही. मी ही कारकीर्द संपवत आहे. हा एक शानदार प्रवास होता ” असं त्याने लिहीलं होतं.

पुढे अरिजित म्हणाला, ” देवाने माझ्यावर खूप कृपा केली आहे. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे आणि एक छोटा कलाकार म्हणून मी आणखी शिकत राहीन आणि अधिक करत राहीन. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या काही पेंडिंग कमिटमेंट्स अजूनही पूर्ण करायच्या आहेत, त्या मी पूर्ण करेन, त्यामुळे यावर्षी तुम्हाला काही रिलीज झालेली गाणी ऐकता येतील. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी संगीत तयार करण सोडणार नाही ” असहील त्याने ट्विटमध्ये स्पष्ट केलं.

अभिनेता सलमान खानच्या “बॅटल ऑफ गलवान” चित्रपटातील “मातृभूमी” हे गाणे अरिजीत सिंगचे शेवटचे गाणे ठरलं. त्याच्या भविष्यातील प्रोजेक्टब्ददल अद्याप तपशील उघड झालेला नाही.तो लाइव्ह शो आणि कॉन्सर्टमधून परफॉर्मन्स सुरू ठेवणार आहे. तसंच स्वतंत्र संगीत निर्मिती देखील करमार आहे. पण गायनातून त्याच्या संन्यासामुळे चाहते नक्कीच हैराण झालेत, अनेकांना हा निर्णय पटलेला नाही.