
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. दोघांच्या लग्नाला 1 वर्ष देखील झालं आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी हिने लग्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता असं सांगितलं… त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत, परंतु त्यांनी आव्हानांचा सामना केला आणि बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. सोनाक्षीने सोहा अली खानच्या पॉडकास्टवर खुलासा केला की, रिलेशनशिपमध्ये असताना तीन वर्षांनंतर त्यांच्यातील तणाव लक्षणीय वाढला. या काळात त्यांना कपल्स थेरपी घ्यावी लागली.
सोनाक्षी सिन्हाने पॉडकास्टमध्ये सांगितलं की, आमच्या नात्यात एक असा टप्पा होता जेव्हा आम्ही एकमेकांचे केस उपटण्यास देखील होते. त्या काळात आम्ही कातीही प्रयत्न केले तरी आम्हाला एकमेकांचा दृष्टिकोन समजत नव्हता. पण आम्हाला आमचं नातं टिकवायचं होतंय… अशात झहीर याने कपल थेरपी घेण्याचा सल्ला दिला.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘कपल थेरपी घेतल्यानंतर आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो… थेरपीच्या फक्त 2 सेशननंतर सर्वकाही पूर्वपदावर आलं होतं…’, सांगायचं झालं तर, सोनाक्षी आणि झहीर कायम त्यांच्या नात्याबद्दल बोलत असतात.
सोनाक्षीने त्यांच्या नात्याची सुरुवात सांगताना म्हटलं की, तिची आणि झहीर याची भेट सलमान खानच्या पार्टीत झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षीने झहीरला भेटल्यानंतर आठवडाभरातच “आय लव्ह यू” म्हटलं. सुरुवातीला झहीरने ती वेडी आहे असं समजून हसून ते टाळलं.
झहीर आणि सोनाक्षी यांनी एकमेकांना 7 वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी आणि झहीर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं.. लग्नानंतर त्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या बॅस्टियन रेस्टोरेंटमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली. जेथे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले.
सोनाक्षी सिन्हा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सोनाक्षी कायम झहीक याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्त करत चाहत्यांना कपल गोल्स देत असते.