Sonakshi Sinha: ‘नवा पाहुणा येणार…’, सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट? नवऱ्यासोबत ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

Sonakshi Sinha: लग्नाच्या एक महिन्यानंतर प्रेग्नेंट आहे सोनाक्षी सिन्हा? नवऱ्यासोबत अभिनेत्रीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, 'नवा पाहुणा लवकरच येणार...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी - झहीर यांच्या नात्याची चर्चा...

Sonakshi Sinha: नवा पाहुणा येणार..., सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट? नवऱ्यासोबत तो व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Jul 22, 2024 | 11:00 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनाक्षी – झहीर यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नानंतर सर्वत्र दोघांच्या धर्मामुळे खळबळ देखील माजली होती. पण घडणाऱ्या सर्व नकारात्म क गोष्टींकडे दुर्लक्ष करत सोनाक्षी – झहीर यांनी फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये झहीर बायको सोनाक्षी हिची काळजी घेताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी सोनाक्षी – झहीर यांची केमेस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत सोनाक्षी हिने ‘प्रेग्नेंट आहेस का?’ असा प्रश्न विचारत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सोनाक्षी प्रेग्नेंट आहे का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लवकरच नवा पाहुणा येणार आहे.’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘बेबी बम्प दिसत आहेत वाटतं…’ सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनाक्षी – झहीर यांची चर्चा रंगली आहे.

 

 

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रेग्नेंसीबद्दल सोनाक्षी हिने मोठं वक्तव्य केलं होतं. लग्नाआधीच माझं आयुष्य सेट असल्यामुळे मी आनंदी आहे. लग्नानंतर फक्त मी रुग्णालयात जाऊ शकत नाही. कारण रुग्णालयात गेल्यानंतर लगेच प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगतात… फक्त एवढाच फरक लग्नानंतर आयुष्यात झाला आहे..’ असं अभिनेत्री म्हणाली होती.

सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वांद्रे येथील घरात सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने मनातील भावना देखील व्यक्त केल्या होत्या.

लग्नानंतर सोनाक्षी हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर अभिनेत्री हॉरर ‘ककूडा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us