AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीब आई – वडिल मुलांच्या लग्नासाठी…, हार्दिक -नताशाा यांच्या घटस्फोटावर दिर्शकाची वादग्रस्त पोस्ट

Hardik Pandya and Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या - नताशा यांच्या घटस्फोटावर प्रसिद्ध दिग्दर्शकाची वादग्रस्त पोस्ट, लग्न स्वर्गात नाहीतर, नरकात ठरतं आणि घटस्फोट..., आई - वडिलांबद्दल देखील दिग्दर्शकाचं लक्षवेधी वक्तव्य, सर्वत्र चर्चांना उधाण...

गरीब आई - वडिल मुलांच्या लग्नासाठी..., हार्दिक -नताशाा यांच्या घटस्फोटावर दिर्शकाची वादग्रस्त पोस्ट
| Updated on: Jul 22, 2024 | 9:22 AM
Share

फिल्ममेकर राम गोपाल वर्मा यांनी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच एक्सवर काही क्रिप्टिक पोस्ट शेअर करत राम गोपाल वर्मा यांनी दिवसागणिक वाढत असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. घटस्फोट स्वर्गात होतात, लग्न नरकात होतात…. असं वादग्रस्त वक्तव्य दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र राम गोपाल वर्मा यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘लग्न नरकात ठरवले जातात, तर लग्न स्वर्गामध्ये…आजच्या घडीचे लग्न फार काळ टिकत नाहीत. जेवढे दिवस आई – वडील लग्न करतात. म्हातारपणी कोणीतरी सोबत असावं म्हणून लग्न केलं जातं. पण लग्नाच्या तुलनेत काळजी घेण्यासाठी एक नर्स ठेवा आणि तिला महिन्याला सॅलरी द्या… हा एक उत्तम पर्याय आहे…’

‘नर्स नोकरी आहे म्हणून जेवढी काळजी घेईल तेवढी काळजी तर, पत्नी देखील घेणार नाही. पण पत्नीला वृद्ध पती कायम अपराधी वाटेल. प्रेम अंधळं असतं आणि लग्न डोळे उघडणारी गोष्ट आहे. प्रेम यशस्वी तेव्हाच होतं जेव्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात सतत प्रेम करण्याची तुमच्याकडे असाधारण क्षमता असेल…’

पुढे ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘सध्याच्या घडीला दिवसागणिक वाढत असलेल घटस्फोट पाहिल्यानंतर असं वाटतं की, मूर्ख आई – वडील तेच आहेत, जे मुलांच्या लग्नासाठी अधिक खर्च करतात.’ सांगायचं झालं तर, नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्मा यांनी असं ट्विट केलं आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत