AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकटं पडल्यासारखं वाटतं, पण मी…, घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर असं का म्हणाली आमिर खानची दुसरी पत्नी?

Kiran Rao on happy after Divorce: घटस्फोटानंतर एकटं पडल्यासारखं वाटतं, पण मी..., आमिर खान आणि अभिनेत्याच्या पहिल्या कुटुंबाबद्दल किरण रावचं मोठं वक्तव्य, घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर किरण राव हिचं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण - आमिर यांच्या नात्याची चर्चा...

एकटं पडल्यासारखं वाटतं, पण मी..., घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर असं का म्हणाली आमिर खानची दुसरी पत्नी?
| Updated on: Jul 22, 2024 | 8:33 AM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांच्या घटस्फोटाला आता तीन वर्ष झाली आहे. 16 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. घोषणेनंतर चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर देखील किरण राव अभिनेत्याच्या पहिल्या कुटुंबासोबत कोणत्याही कार्यक्रमात दिसते. सांगायचं झालं तर, आमिर खान याची दोन्ही कुटुंब एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. दरम्यान, ‘लापता लेडिज’ सिनेमाचं प्रमोशन सुरु असताना किरण राव हिने ‘घटस्फोटानंतर आनंदी आहे…’ असं वक्तव्य केलं होतं.

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे. घटस्फोटनंतर बदललेल्या आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटतं की काही वेळ गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या नात्याला वेगळ्याप्रामाणे परिभाषित करावं लागतं. याचं कारण म्हणजे, आपण जसे-जसे मोठे होत जाते, तसं एक व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये अनेक बदल होत असतात. आपल्याला वेग-वेगळ्या गोष्टींची गरज भासू लागते. मला असं वाटतं की घटस्फोटानंतर मी अधिक आनंदी झाली आहे. याला तुम्ही एका आनंदी घटस्फोट देखील म्हणू शकता…’

पुढे किरणा राव म्हणाली, ‘जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा अनेक वर्ष मी एकटी राहिली होती. मी लग्नाआधी माझ्या आयुष्याचा आणि स्वातंत्र्याचा पूर्ण आनंद घेतला आहे. तेव्हा मला एकटं असल्यासारखं व्हायचं. पण आता माझ्या मनात तशा भावना नाहीत. कारण आता माझ्यासोबत माझा मुलगा आहे. मी आझाद याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.’

‘घटस्फोटानंतर आयुष्यात एकटं पडल्यासारखं अनेकांना वाटतं. पण मला असं कधीच वाटलं नाही. कारण आमिरच्या कुटुंबाने कधीच मला एकटीला सोडलं नाही. त्यांच्याकडून मला पूर्ण पाठिंबा मिळाला. आम्हाला घटस्फोट घेण्यासाठी फक्त एका कागदाची (घटस्फोटाचा अर्ज) गरज होती. पण आम्हाला माहिती होतं की, आम्ही एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहोत.. ही गोष्ट आम्हाला माहिती होती.’

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)

‘आजही आमच्यात भरपूर प्रेम आहे. आमच्या जुन्या आठवणी माझ्यासोबत आहेत. ज्या मी कधीच नाही विसरणार..’ असं देखील किरण राव म्हणाली. किरण राव कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. सावत्र मुलगी आयरा खान हिच्या लग्नात देखील किरण राव आनंदी दिसली. शिवाय आयराच्या लग्नात किरण हिने गाणं देखील गायलं होतं…

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत