
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा आज म्हणजेच 2 जून रोजी 38 वा वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. आज ती तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनाक्षीने झहिर इक्बालशी लग्न केल्यानंतर ही जोडी कायम चर्चेत असते.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा तथा अभिनेत्याच्या प्रेमात होती सोनाक्षी
पण हे फार कमी जणांना माहित आहे की सोनाक्षी लग्नाआधी एका अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती. हा अभिनेता आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा देखील आहे. सोनाक्षीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे आहेत ज्यांच्याशी तिचे नाव अनेकदा जोडले गेले होते.
वडिलांच्या विरोधामुळे या नातं तुटलं
एका चित्रपटाच्या शुटींगवेळी सोनाक्षी त्या अभिनेत्याच्या प्रेमात होती मात्र वडिलांच्या विरोधामुळे या नात्याला कायमचा रामराम करावा लागला. हा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर यांनी लुटेरा चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळी रणवीर अनुष्का शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असला तरी चित्रपटाच्या सेटवर सोनाक्षी आणि रणवीर या दोघांमधील जवळीक वाढत होती. त्यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र पसरल्या होत्या. मात्र वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा या नात्याला पूर्णपणे विरोध होता म्हणूनहे नातं पुढे जाऊ शकलं नाही असंही म्हटलं जातं.
‘तो माझ्या टाईपचा नाही…’
सोनाक्षी आणि रणवीरने त्यांच्या नात्यावर कधीही भाष्य केलं नाही. पण एकदा सोनाक्षीने त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर म्हटलं होतं की, ”रणवीर माझ्या टाईपचा नाही. आमच्या दोघांबद्दलच्या अशा बातम्या मला अस्वस्थ करतात. कारण मला माझ्या कुटुंबालाही उत्तर द्यावं लागतं”
11 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत 5 जणांना डेट
दरम्यान सोनाक्षी सिन्हा बद्दल जाणून आश्चर्य वाटेल की तिने तिच्या 11 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत 5 जणांना डेट केल्याचं म्हटलं आहे. त्यामध्ये पहिलं नाव होतं तिचा जुना प्रियकर आणि सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सजदेहसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं त्यानंतर तिचं नाव शाहिद कपूर, अर्जुन कपूरसोबतही जोडलं गेलं. मात्र जेव्हा जेव्हा सोनाक्षीला तिच्या लव्ह लाइफबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की या सर्व गोष्टी अफवा आहेत आणि त्याबद्दल बोलणे कधीही योग्य वाटले नाही.