
अनेक बॉलिवूड कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही.

कनिका अरोरा सोनाक्षी सिन्हासारखीच दिसते. कनिका न्यूयॉर्कची बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहे. सोनाक्षीची स्टाईलही ती बर्यापैकी कॉपी करते.

काही दिवसांपूर्वी कनिका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, हे पाहून ती सोनाक्षी सारखीच दिसते हे स्पष्ट झालं.

विशेष म्हणजे कनिकासुद्धा स्वत: ला सोनाक्षीची कॉपी मानते, म्हणून ती तिच्यासारखं दिसण्यासाठी मेक-अप कॉपी करते.

कनिकाचे फोटो समोर आल्यावर तिला पहिल्यांदा पाहून सोनाक्षीचे चाहते गोंधळात पडले होते.