अभिनेत्री सोनाली बेंद्रे नक्की कोणाच्या प्रेमात होती? रोमांचक आहे दोघांची ‘प्रेम कहाणी’

पहिल्या नजरेत सोनाली बेंद्रेच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता 'हा' व्यक्ती; दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये असे काही वळण आले ज्यामुळे...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे नक्की कोणाच्या प्रेमात होती? रोमांचक आहे दोघांची प्रेम कहाणी
| Updated on: Feb 25, 2023 | 4:24 PM

sonali bendre Love story : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. ९० च्या दशकात सोनाली बेंद्रे हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज सोनाली मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, अभिनेत्री चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली. कायम आपल्या प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी सोनाली, एक काळ तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत होती.

अभिनेत्री सोनाली बेद्रें आणि गोल्डी बहल (goldie behl) यांच्यासोबत लग्न केलं आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतर आजही सोनाली – गोल्डी एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत. गोल्डी आणि सोनाली यांची पहिली भेट १९९४ साली ‘नाराज’ सिनेमाच्या सेटवर झाली. पहिल्या नजरेतच गोल्डी, सोनालीच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता. गोल्डीला सोनाली हिच्यापासून दूर जायचं नव्हतं. (sonali bendre husband)

याच दरम्यान, गोल्डीने महेश भट्ट यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काय करण्यास सुरुवात केली. ज्या सिनेमात गोल्डीने काम करण्यास सुरुवात केली, त्याच सिनेमात सोनाली देखील होती. अशाप्रकारे गोल्डीला सोनालीसोबत काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान दिवसागणित सोनाली प्रति गोल्डीचे प्रेम वाढत होतं. (sonali bendre love life)

 

 

सिनेमांच्या कामानिमित्त कायम गोल्डी आणि सोनाली यांची भेट व्हायची. पण गोल्डी कधीही त्याच्या मनातील भावना सोनाली पुढे व्यक्त करु शकला नाही. असं असताना एका पार्टीमध्ये गोल्डीच्या बहिणीने दोघांची ओळख करून दिली. त्या पार्टीनंतर दोघे चांगले मित्र झाले. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं . (sonali bendre last movie)

मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाल्यानंतर १९९८ साली गोल्डीने सोनाली हिला प्रपोज केला. प्रपोज केल्यानंतर ४ वर्षांनी गोल्डी आणि सोनाली यांनी लग्न केलं. सोनाली आणि गोल्डी यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव रणवीर असं आहे. तर गोल्डी प्रसिद्ध निर्माता आहे. त्याने ‘अंगारे’, ‘बस इतना सा ख्वाब है’ आणि ‘लंडन पॅरिस न्यूयॉर्क’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. २०१८ साली अभिनेत्री कर्करोग ग्रस्त असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर अभिनेत्री उपचारासाठी अमेरिकेत गेली होती. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर अभिनेत्री अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील दिसली. सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.