Sonia Gandhi : ते दुःख…सोनिया गांधी यांनी गमावलेलं पहिलं बाळ, बच्चन कुटुंब बनलेलं आधार; सांगितला प्रसंग

Sonia Gandhi On Bachchan Family : सोनिया गांधी यांनी त्यांचं पहिलं बाळ गमावलेलं. या कठीण काळात बच्चन कुटुंबानं त्यांना आधार दिला. याबद्दल सोनिया यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे.

Sonia Gandhi : ते दुःख...सोनिया गांधी यांनी गमावलेलं पहिलं बाळ, बच्चन कुटुंब बनलेलं आधार; सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 13, 2026 | 5:45 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंबीय यांच्यातील मैत्रीचे किस्से अनेकदा चर्चेत येतात. विशेषतः अमिताभ बच्चन आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र, राजीव गांधी यांच्याशी लग्न होण्यापूर्वी सोनिया गांधी यांचं बच्चन कुटुंबाशी किती जवळचं नातं होतं, याचा एक भावनिक खुलासा त्यांच्या आत्मचरित्रातून समोर आला आहे. अमिताभ बच्चन यांचं घर हे आपल्यासाठी माहेरघरासारखं होतं, अशी आठवण सोनिया गांधी यांनी सांगितली आहे.

सोनिया गांधी यांच्या Belonging – A Journey of Love या आत्मचरित्रात त्यांनी भारतात आल्यानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते बच्चन कुटुंबासोबतच्या नात्यापर्यंत अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. 1968 मध्ये राजीव गांधी यांच्याशी लग्न करण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. त्यावेळी दिल्लीतील बच्चन कुटुंबानं त्यांचं अगदी आपुलकीनं स्वागत केलं होतं.

Loading...

सोनिया गांधी यांनी म्हटलंय की, मला त्यांच्या प्रेमानं खूपच दिलासा मिळाला आणि सुरक्षित वाटू लागलं. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्या कायम मदतीला आणि मार्गदर्शन करायला तत्पर असायच्या.दुसऱ्या दिवशी त्यांची ओळख ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांच्याशी झाली. त्यांनी सोनिया यांना हिंदी भाषा शिकण्यास मदत केली. त्यावेळी सोनिया यांना हिंदी नीट समजत नव्हती. भारतीय इंग्रजी भाषेतील उच्चारही त्यांच्यासाठी नवीन होते. हरिवंशराय बच्चन अधूनमधून त्यांना हिंदी शिकवायचे. याचदरम्यान, त्यांनी सोनिया यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला होता. एखादी व्यक्ती प्रत्यक्षात काय आहे, यापेक्षा लोक तिच्याबद्दल काय विचार करतात, हे या देशात अधिक महत्त्वाचं ठरतं, असं ते म्हणाले होते. सुरुवातीला त्यांचा हा सल्ला सोनिया यांना फारसा समजला नव्हता. मात्र, पुढील आयुष्यात त्यांना या शब्दांचा अर्थ उमगला.

संकटाच्या काळातही तेजी बच्चन यांनी दिली साथ

सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगातही बच्चन कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं राहिलं होतं. राजीव आणि सोनिया यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म अकाली झाला होता. दुर्दैवानं जन्मानंतर काही काळातच त्या बाळाचा मृत्यू झाला. या दुःखातून सावरणं सोनिया यांच्यासाठी खूप कठीण होतं. सोनिया गांधी यांनी लिहिलं की, ‘माझं मन रमवण्यासाठी तेजी आंटींनी मला एक कुत्र्याचं पिल्लू भेट दिलं. आम्ही तिचं नाव रेश्मा ठेवलं होतं. तिची काळजी घेतल्यानं बाळ गमावण्याचं दुःख काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us