AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत नेहमीच…. छट पुजेला विरोध आहे की नाही? संजय राऊत स्पष्टच बोलले, ठाकरेसनेची भूमिका मांडली

फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी भाजपच्या सत्तेबाबतही मोठं विधान केलं. त्यांनी राज्यातील छटपुजेच्या वादावरही भाष्य केलं आहे.

मुंबईत नेहमीच.... छट पुजेला विरोध आहे की नाही? संजय राऊत स्पष्टच बोलले, ठाकरेसनेची भूमिका मांडली
sanjay raut clarifies his stand on chhath pujaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 5:38 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाची बुलंद तोफ संजय राऊत आज मुंबईतील टिळक भवनात दाखल झाले. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध गरम मुद्द्यांवर भाष्य केलं. तिथे त्यांनी आपण स्वतः टिळक भवनात कसे, याप्रश्नाचंही उत्तर दिलं. राऊत म्हणाले की, पंडीत नेहरुंचा कार्यक्रम ठेवलाय तर आलच पाहिजे. टिळक भवनात मी याआधीही आलेलो आहे. विलासराव देशमुख यांच्यासोबत इथे आलो होतो. यामध्ये भुवया उंचावण्यासारख काही नाही. याआधी देखील इथे आलो आहे. महान माणसं या मातीत होऊन गेली. आज मला निमंत्रित केलं म्हणून मी आलो. प्रतापराव भोसले प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हाही आलो होतो. या वास्तूमध्ये महान माणसं होऊन गेले आहेत, असं राऊतांनी म्हटलं.

सत्ता जाण्याच्या मार्गावर नाही, तर सत्ता गेली

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या फोन टॅपिंगवरही त्यांनी भूमिका मांडली.  मोदी शहांच्या राज्यात दुसर काय होणार? ज्यांनी ज्यांनी फोन टॅपिंगचे उपक्रम केलं, मग ते नेत्यन्याहु असतील किंवा निक्सन, सगळे राजकारणातून हद्दपार झाले, पराभूत झाले. मोदींच्या राजकीय राजकारणाला घरघर लागली आहे. सत्ता जाण्याच्या मार्गावर नाही, तर यांची सत्ता गेली आहे, असं राऊतांनी म्हटलंय. त्याचवेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. गांधींनी त्यांचे अनुभव या पुस्तकात लिहीले आहेत, असं खासदार राऊत म्हणाले.

छटपुजेला विरोध नाही…

त्याचवेळी त्यांनी छटपुजेवरुन सुरु असलेल्या वादावरही भाष्य केलं, राऊत म्हणाले की छट पुजेला विरोध नाही, इतक्या वर्षांपासून मुंबईत नेहमीच छटपुजा केली जाते. कोणी विरोध केला? त्याच्या नावाखाली जे राजकारण सुरु आहे त्यावर आक्षेप आहे. तुम्ही त्याआडून रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणी वाजवत आहात. हे जे प्रकार आहेत ते मग इतर सणांच्यावेळीही व्हावेत, अशी मागणी समोर येत आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेने बाणगंगा आणि उल्हासनगरात छटपुजेच्या कार्यक्रमामुळे जलप्रदुषण होत असून गणेश उत्सव, नवरात्रोत्सवाला तुम्ही आमच्या मराठी जनतेबाबत जी भूमिका घेता तिच भूमिका तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांच्या सण-उत्सवांबाबत प्रशासनाने घेतली पाहिजे, असं मनसेने म्हटलं आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप