सर्जरीच्या वेदनेतही सोनू निगमने गायले मोहम्मद रफी यांचं सुपरहिट गाणं; चाहते म्हणाले डॉक्टर नशीबवान आहेत

सोनू निगमने त्याच्या सर्जरीच्या दरम्यान गायलं 77 वर्षांपूर्वीचं मोहम्मद रफी यांचं सर्वात सुपरहिट गाणं. सुंदर आवाज ऐकून डॉक्टर आणि टीमने देखील केलं कौतुक.

सर्जरीच्या वेदनेतही सोनू निगमने गायले मोहम्मद रफी यांचं सुपरहिट गाणं; चाहते म्हणाले डॉक्टर नशीबवान आहेत
| Updated on: Aug 09, 2026 | 2:49 PM

आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय गायक सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तो रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे सर्जरी सुरू असतानाही त्याने गाणं गात डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे मनोरंजन केले.

या व्हिडिओमध्ये सोनू निगम सर्जरीच्या टेबलवर झोपलेला दिसत असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करताना दिसत आहेत. याचदरम्यान सोनू निगमने ‘सुहानी रात ढल चुकी’ हे लोकप्रिय गाणं गायले. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या दुलारी चित्रपटातील हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायले होते. तब्बल अनेक दशकांनंतरही हे गाणं सोशल मीडियासह अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

सोनू निगमने हा व्हिडिओ शेअर करताना सर्जरीदरम्यान डॉक्टर निलेश सतभाई आणि त्यांच्या टीमसाठी अचानक केलेल्या या परफॉर्मन्सचा उल्लेख केला. वेदनेच्या परिस्थितीतही संगीताचा आनंद घेता येतो असा भाव त्याने आपल्या पोस्टमधून व्यक्त केला. सध्या सोनू निगमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोनू निगमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. सर्जरी सुरू असतानाही त्याचा सुरेल आवाज ऐकून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. अनेकांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर करत त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही चाहत्यांनी सोनूच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त करत त्याला नेमके काय झाले आहे अशी विचारणा देखील केली.

नव्या गाण्याचीही चर्चा

दरम्यान, सोनू निगमचे नवीन हिंदी-हरियाणवी गाणं ‘चुन्नी’ देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याला यूट्यूबवर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 90 च्या दशकापासून आपल्या आवाजाने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या सोनू निगमने आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यामुळे सर्जरीच्या काळातही त्याने गायलेल्या गाण्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us