
तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. गेले अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केले आहे.

आता चाहत्यांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. इतकंच नाही तर चाहते त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल करतात. नुकतंच सोनूची भूमिका साकारणारी निधी भानुशालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, आता जूनी सोनू म्हणजेच झील मेहताचे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

झील मेहतानं शो सोडून आता बराच काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत, आता ती कुठे आहे याचा विचार चाहत्यांना येणं स्वाभाविक आहे.

टप्पू सेनाची मेंबर असलेली सोनू म्हणजे झील मेहता आता खूप मोठी झाली आहे. सध्या ती एमबीए करत आहे. बीबीए पदवी पूर्ण केल्यानंतर तिनं एमबीएमध्ये प्रवेश घेतला.

एवढंच नाही तर झील मेहता एका खासगी ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहेत.

शोमध्ये चार वर्षे काम केल्यानंतर सोनू म्हणजेच झील मेहतानं शोला निरोप दिला होता. खरं तर, त्यावेळी सोनूची दहावीची परीक्षा होती आणि शोमुळे अभ्यास करणं सोपं नव्हतं, म्हणून तिनं शोला निरोप दिला होता.