Abhishek Bachchan : रागाच्या भरात मी अभिषेक आणि करीनावर माईक फेकून मारला…दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग, काय घडलेलं?

Director On Abhishek Bachchan And Kareena Kapoor : दिग्दर्शकानं अभिषेक बच्चन आणि करीना कपूर यांच्यावर माईक फेकून मारलेला. त्याबद्दल त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Abhishek Bachchan : रागाच्या भरात मी अभिषेक आणि करीनावर माईक फेकून मारला...दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग, काय घडलेलं?
| Updated on: Nov 28, 2026 | 8:39 PM

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या चार वर्षांनंतर ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात परतले आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्यांच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे. मात्र, अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टवर सूरज बडजात्या यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. सूरज बडजात्या यांनी खुलासा केला आहे की, एकदा सेटवर त्यांचा संयम सुटला होता. सूरज, अभिषेक बच्चन आणि करीना कपूर खान यांच्यावर रागावले होते आणि त्यांनी अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिली होती. चित्रपट दिग्दर्शकानं खुलासा केला की, त्यांनी त्या दोन्ही कलाकारांवर माईकसुद्धा फेकला होता. ही घटना त्यांच्या ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’ या चित्रपटाच्या सेटवर घडली होती.

सिद्धार्थ कन्ननने सूरज बडजात्या यांना विचारलं की, त्यांचा कधी सेटवर संयम सुटला होता का? यावर उत्तर देताना सूरज यांनी 2003 सालच्या ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’ या चित्रपटाचा किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की, या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि करीना कपूर एकत्र काम करत होते. त्यांना ते दोघेही खूप आवडत होते, पण सेटवर त्यांची खोडसाळपणा जरा जास्तच होता. जेव्हा जेव्हा अभिषेक आणि करीना सेटवर भेटायचे, तेव्हा ते एकमेकांशी थट्टामस्करी आणि विनोद करायचे. यामुळे चित्रपटाच्या सीनची तालीमसुद्धा होऊ शकली नाही.

Loading...

रागाच्या भरात माईक फेकून मारला

सूरज यांनी पुढे सांगितलं की, अभिषेक बच्चन खूप विनोदी स्वभावाचा आहे आणि त्याला खोड्या करायला आवडतात. तो त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे, पण त्यावेळी शूटिंगची वेळ झपाट्यानं संपत होती. त्यातच, सूरज बडजात्या यांची झोपही पुरेशी झाली नव्हती. त्या दोघांची सततची थट्टामस्करी पाहून त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी रागानं दोघांवर माईक फेकून मारला.

दरम्यान, 2003 साली प्रदर्शित झालेला ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून सिनेमाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. यामध्ये हृतिक रोशन, करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us