चीनमध्ये इतकं सोनं सापडलं की आफ्रीकेतील अनेक देशांचा दोन ते तीन वर्षांचा खर्च भागेल…पण…
हे खनिज क्षेत्र सुमारे 3000 मीटर लांब आणि 1,500 मीटर रुंद आहे. नव्या सर्वेक्षणा दरम्यान केलेल्या ड्रिलिंग चाचणी प्रत्येक बोरहोलमधून सोन्याचे पुरावे मिळाले. नोव्हेंबर 2025 चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने सखोल ड्रिलिंगच्या आधारे येथे 1,444 टन सोने असल्याचे घोषीत केले आहे, या संशोधनाला चीनच्या खणन इतिहासाची मोठी उपलब्धता मानली जात आहे.

चीन भौगोलिकदृष्ट्या अक्राळ विक्राळ असून तेथे नैसर्गिक साधनसामुग्री अपाम आहे. यात चीनच्या जमीनीखाली मोठ्या प्रमाणावर सोने लपलेले आहे. यातील सर्वात मोठी सोन्याचा साठा लियाओनिंग प्रांताच्या दादोंगगौ (Dadonggou) भागात आहे. तर दुसरा मोठा सोन्याचा साठा भंडार हुनान प्रांताच्या वांगू (Wangu)येथे आहे.दादोंगगौत सोने असल्याचे संकेत दशकाहून आधी मिळालेले होते. परंतू त्यावेळी या सोन्याच्या आर्थिक उपयोगासंदर्भात संशोधक आणि वैज्ञानिकांचे एकमत नव्हते. चीनच्या नैसर्गिक साध संपत्ती मंत्रालयाने नोव्हेंबर २०२५ च्या अधिकृत अंदाजानुसार लियाओनिंग प्रांतांच्या दादोंगगौ मध्ये तब्बल 1,444 टन सोन्याचा साठा आहे. हा 1949 नंतर चीनमध्ये शोध लागलेला आतापर्यंतचा एकमेव सोन्याचा साठा आहे.
याशिवाय हुनान प्रांतांत वांगूमध्ये 1000 टनाहून अधिक सोन्याचा साठा असल्याचा अंदाज आहे. वांगूतील 1,000 टनाचा आकडा देखील अंदाजावर आधारित आहे. याच्या खात्रीसाठी पुढे आणि ड्रिलिंग तसेच भौगोलिक सर्वेक्षणाची गरज आहे.
नोव्हेंबर २०२६ च्या अखेर सोन्याच्या किंमतीत सुमारे 3,550 डॉलर प्रति ट्रॉय औंस मानली तर दादोंगगौच्या सोन्याची सैद्धांतिक किंमत सुमारे 165 अब्ज डॉलर बसते. तर वांगूच्या संभाव्य साठ्याचे मुल्य सुमारे 114 अब्ज डॉलर असू शकते. दोन्हींना मिळून हा आकडा सुमारे 279 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 300 अब्ज डॉलरच्या आसपास पोहचू शकतो.
परंतू हे जमीनीवरील उपलब्ध झाल्यानंतरचे सोन्याचे अंदाजित बाजारमुल्य आहे, चीनला मिळणारी वास्तविक कमाई नाही. खणन, प्रसंस्करण, परिवहन आणि अन्य खर्च घटवण्यानंतर वास्तविक आर्थिक फायदा किती होईल यांचा थांगपत्ता लागू शकतो.
आफ्रीकासारख्या देशांचा दोन- तीन वर्षांचा खर्च आहे
चीनमध्ये सापडलेल्या 2,000 टनाहून जास्त सोन्याची अंदाजित किंमत सुमारे 279 अब्ज डॉलर (सुमारे 25 लाख कोटी रुपये) मानली तर ही रक्कम अनेक देशांच्या वार्षिक सरकारी खर्चा चालवण्यासाठी पुरेशी आहे. काही देशांचा दोन ते तीन वर्षांचा खर्च यातून भागू शकेल इतकी ही रक्कम मोठी प्रचंड आहे.
दादोंगगौमध्ये सोन्याचा शोध कसा लागला ?
दादोंगगौ येथील सोन्याच्या शोधाची कहाणी मोठी रंजक आहे. 1980 च्या दशकात येथील भागात डोंगर कड्यांवर सोन्याचे छोटे-छोटे संकेत मिळाले होते. त्यावेळी या सोन्याच्या साठ्याला हस्तगत करणे आर्थिक दृष्टीने उपयोगी न मानून खर्चिक मानले गेले होते. मात्र, नंतर पुन्हा संशोधन झाले तर विखुरलेले हे साठे वास्तवात एक मोठ्या आणि सतत पसरलेल्या खनिज क्षेत्राचा एक भाग असल्याचे लक्षात आले.
हे खनिज क्षेत्र सुमारे 3000 मीटर लांब आणि 1,500 मीटर रुंद आहे. नव्या सर्वेक्षणा दरम्यान केलेल्या ड्रिलिंग चाचणी प्रत्येक बोरहोलमधून सोन्याचे पुरावे मिळाले. नोव्हेंबर 2025 चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने सखोल ड्रिलिंगच्या आधारे येथे 1,444 टन सोने असल्याचे घोषीत केले या शोधाने चीनच्या खणन इतिहासाची मोठी उपलब्धता मानली जात आहे.
