‘नो वॉटर डाएट’ पडला भारी; लग्नाच्या 3 दिवस आधी अभिनेता सेटवर बेशुद्ध

सिक्स पॅक ॲब्ससाठी अभिनेत्याचा 'नॉन-लिक्विड डाएट'; सेटवर पडला बेशुद्ध

'नो वॉटर डाएट' पडला भारी; लग्नाच्या 3 दिवस आधी अभिनेता सेटवर बेशुद्ध
Naga ShouryaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 10:28 AM

मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नाग शौर्यच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाग शौर्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी तो आगामी ‘एन एस 24’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. अशातच अचानक सेटवर त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. नाग शौर्यला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या 20 नोव्हेंबर रोजी तो लग्नबंधनात अडकणार आहे.

तब्येत बिघडण्याचं कारण काय?

‘NS 24’ या चित्रपटात नाग शौर्यचे बरेच ॲक्शन सीक्वेन्स आहेत. यासाठी त्याने विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे. ॲक्शन सीनदरम्यान परफेक्ट बॉडी दिसण्यासाठी तो नो वॉटर डाएट करत होता, अशीही माहिती समोर आली आहे. म्हणजेच तो कोणत्याही प्रकारचे द्रव्य पदार्थांचं सेवन करत नव्हता. नॉन-लिक्विड डाएट आणि सिक्स-पॅक ॲब्ससाठी तासनतास जिममध्ये व्यायाम केल्याने त्याची तब्येत बिघडल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Naga Shaurya (@actorshaurya)

शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने सेटवर नाग शौर्य बेशुद्ध पडला. एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रॉएंटरोलॉजी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी त्याचं प्रेयसी अनुषा शेट्टीसोबत लग्न होणार आहे. सोशल मीडियावर त्याने लग्नपत्रिकेचा फोटोसुद्धा शेअर केला होता.

या लग्नसोहळ्याला कुटुंबीय, मित्रपरिवार आणि फिल्म इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नापूर्वीचे कार्यक्रम बेंगळुरूतील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये पार पडणार आहेत. 19 नोव्हेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आणि 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.25 ला विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

नाग शौर्य अभिनेत्यासोबतच उत्तम लेखक आणि निर्मातासुद्धा आहे. 2011 मध्ये त्याने ‘क्रिकेट, गर्ल्स अँड बीअर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘चंदामामा कथलू’मध्येही त्याने भूमिका साकारली आहे. ‘ओ बेबी’ या चित्रपटात त्याने समंथा रुथ प्रभूसोबत स्क्रीन शेअर केला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.