
मुंबई : चंद्रमुखी 2 हा कंगना राणावत (Kangana Ranaut) हिचा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कंगना राणावत हिचे काैतुक केले जातंय. चंद्रमुखी 2 चित्रपट (Movie) 28 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय. चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत ही दिसतंय. चंद्रमुखी 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आलंय.
नुकताच आता चंद्रमुखी 2 चित्रपटाचे काैतुक करताना साऊथ स्टार रजनीकांत हे दिसले आहेत. चंद्रमुखी 2 चित्रपटाचे काैतुक करण्यासाठी रजनीकांत यांनी एक खास पत्र लिहिले आहे. मात्र, यामध्ये रजनीकांत यांनी कंगना राणावत हिचे नाव घेणे टाळल्याचे दिसतंय. यानंतर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.
यावरून लोक अंदाजा लावत आहेत की, रजनीकांत यांना कंगना राणावत हिचा अभिनय आवडला नाही. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता राघव लॉरेंस याने पोस्ट शेअर करत लिहिले की, यामुळे माझा आजचा दिवस सुंदर बनला आहे, माझे भाऊ, माझे गुरु, माझे थलायवर सुपरस्टार यांच्याकडून एक आश्चर्यजनक प्रेस नोट मिळालीये.
This has made my day, a surprise love note ✍🏻 🕴🏻 from my Brother, my Guru, my Thalaivar Superstar @rajinikanth ❤️ What more praise would we need for #Chandramukhi2 – your encouragement means the world to us. 🙏🏻 Thank you Thalaiva! 🤝🏻
Guruve Saranam 🙏🏻🙏🏻🙏🏻#PVasu @KanganaTeam… pic.twitter.com/X1AAOzew0C— Raghava Lawrence (@offl_Lawrence) September 29, 2023
आम्हाला चंद्रमुखी 2 साठी अजून काय प्रशंसा हवी आहे ना. तुम्ही दिलेले हे प्रोत्साहन आमच्यासाठी खरोखरच खूप महत्वाचे आहे. धन्यवाद थलायवा. गुरुवे शरणम्…आता राघव लॉरेंस यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. मात्र, या पोस्टमध्ये कुठेच कंगना राणावत हिचे नाव नाहीये.
कंगना राणावत ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कंगना राणावत नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे कलाकार दिसतात. काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत ही थेट रणबीर कपूर याच्यावर टीका करताना दिसली. करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहितीये.