
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी ग्लॅमरही पाहिलं आणि आयुष्यातील सर्वात वाईट काळही पाहिला. पण अशाही अभिनेत्री आहेत ज्यांनी ऐकेकाळी त्यांच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं होतं त्यांच्यावर एवढी वाईट वेळ आलेली पाहायला मिळाली की कोणी कल्पनाही करणार नाही. अशीच एक अभिनेत्री जिने तिच्या काळात ग्लॅमर अनुभवला, प्रसिद्धी अनुभवली पण नंतर तिचे दिवस असे पालटले की चक्क तिला वेश्याव्यवसायात उतरण्याची वेळ आली. शेवटच्या क्षणांमध्ये तर या अभिनेत्रीच्या शरीरावर किडे रेंगाळू लागले होते. प्रसिद्धीच्या झोतात आयुष्य घालवणाऱ्या या सौंदर्यवतीला वेश्या बनण्यास भाग पाडले गेले.कोण होती ही अभिनेत्री जाणून घेऊयात.
साऊथ अभिनेत्री
ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत ती अभिनेत्री म्हणजे 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री निशा नूर. जिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत सुमारे 17 चित्रपट केले, ज्यामध्ये तिने कमल हासन आणि रजनीकांत सोबत स्क्रीन शेअर केली.
चित्रपट मिळणे बंद झाले
निशा नूरने ‘मंगला नायगी’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने पदार्पण केले. या चित्रपटातून तिला बरीच ओळख मिळाली. पण 90 च्या दशकात तिला चित्रपट मिळणे बंद झाले आणि तिच्या कारकिर्दीत वेगानं खाली येऊ लागली. तिला हळूहळू चित्रपट मिळणे बंद झालं होतं. तिच्यावर आर्थिक संकट ओढावलं होतं. तिला पैशांची चणचण भासू लागली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की चक्क तिला नाईलाजास्तव वेश्याव्यवसायात उतरावं लागलं.
अभिनेत्री वेश्याव्यवसायात उतरली
असे म्हटले जाते की एका निर्मात्याने आर्थिक अडचणीत असलेल्या या अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर निशाला हा मार्ग स्वीकारावा लागला आणि त्यानंतर ती कधीही दलदलीतून बाहेर पडू शकली नाही. वेश्या व्यवसायामुळे कुटुंबातील सदस्यांनी अभिनेत्रीपासून स्वतःला दूर केले. परिणामी, अभिनेत्री हळूहळू अनामिक झाली. सुमारे 12 वर्षांनंतर, 2007 मध्ये, अभिनेत्री खूप वाईट स्थितीत दिसली. फाटलेले आणि जुने कपडे, ज्यावर मुंग्या आणि कीटक रेंगाळत होते.
अभिनेत्रीला एड्स झाला
तिची अवस्था पाहून तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात, अभिनेत्रीने स्वतःच सांगितले की चित्रपट सोडल्यानंतर तिने वेश्याव्यवसाय सुरू केला आणि याच काळात तिला एड्स सारखा धोकादायक आजार झाला. आणि याच आजाराने अभिनेत्रीचा मृत्यू झाला.