AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याचा कारमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण…

स्वतःच्याच कारमध्ये अभिनेत्याचाच भयानक अवस्थेत आढळला मृतदेह..., काय आहे अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण? अभिनेत्याला पोलिसांनी काय केलेली अटक? त्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसिद्ध अभिनेत्याचा कारमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण...
फाईल फोटो
| Updated on: Aug 05, 2025 | 8:02 AM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साउथ कोरियन अभिनेता सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची माहिती समोर आली आहे. 3 ऑगस्ट रोजी सॉन्ग यंग-क्यू त्याच्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळला. अद्याप अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सॉन्ग यंग-क्यू सर्वत्र चर्चेत होता. कारण अभिनेता दारू पिऊन ड्राईव्ह करत होता. अशात अचानक सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची माहिती समोर आल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

सॉन्ग यंग-क्यू यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी होती. अशात सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची बातमी कळल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सॉन्ग यंग-क्यू याने ‘बिग बेट’, ‘ह्वारांग’, ‘हॉट स्टोव लीग’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. या सिनेमांशिवाय अभिनेता दुसऱ्या कोणत्या कोरियन सिनेमाचा भाग नव्हता. स्थानिक वृत्तसंस्था कोरियाबूनुसार, अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही, परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीने अभिनेत्याला त्याच्या गाडीत मृतावस्थेत पाहिलं, असं म्हटलं जात आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी, अभिनेत्याला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सॉन्ग यंग-क्यू याच्या अडचणी खूप वाढल्या. अभिनेत्याच्या बाबतीत असं सांगितलं जात होतं की, त्याला स्वतःचे अनेक प्रोजेक्ट्स गमवावे लागले होते आणि त्याला अनेक भूमिकांमधूनही काढून टाकण्यात आलं होतं.

अभिनेत्याला झालेली अटक

दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अभिनेत्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर, अभिनेत्याची चाचणी करण्यात आली आणि त्यात त्याच्या रक्तात 0.08 टक्के अल्कोहोल असल्याचं आढळून आलं. सॉन्ग यंग-क्यू याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र सॉन्ग यंग-क्यू याच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा