या बॉलिवूड अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केल्या 29 सर्जरी; अमिताभ बच्चन ते शाहरूखपर्यंत सर्वच तिचे चाहते

अशी एक अभिनेत्री आहे जिने तिच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलंच पण स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी या अभिनेत्रीने चक्क 29 सर्जरी केल्या होत्या. या अभिनेत्रीचते करोडो चाहते आहेतच पण बॉलिवूड स्टारही या अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. 

या बॉलिवूड अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केल्या 29 सर्जरी; अमिताभ बच्चन ते शाहरूखपर्यंत सर्वच तिचे चाहते
Sridevi 29 Surgeries
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2025 | 6:44 PM

भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या शरीरावर, विशेषतः त्यांच्या चेहऱ्यावर अनेक सर्जरी केल्या आहेत. पण बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री जिने आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी चक्क 29 शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि ही अभिनेत्री भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडसह साऊथमध्येही तिची खास ओळख निर्माण केली.

 शरीरावर आणि चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग 

अभिनेते आणि अभिनेत्री आपलं ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. जरी बाहेरील लोकांना असे वाटेल की अभिनेते आणि अभिनेत्री लक्झरी जीवन जगत आहे. परंतु त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अशीच ही अभिनेत्री जिने मेहनतीने आणि संघर्षाने बॉलिवूडमध्ये आपली जागा तर बनवली पण तिने आपले सौंदर्य टिकवण्यासाठी आपल्या शरीरावर आणि आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.

29 सर्जरी करून स्वत:ला सुंदर बनवलं

ही अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. ज्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ आपल्या सुंदर अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीला मंत्रमुग्ध केले. श्रीदेवी यांचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी जवळील एका गावात झाला. अनेक चित्रपट समीक्षकांनी म्हटले आहे की भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी कोणीही नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसत असलेल्या श्रीदेवी यांनी 29 सर्जरी करून स्वत:ला सुंदर बनवलं. पण त्यासाठी त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली आणि अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागला.

लेझर स्किन सर्जरी, सिलिकॉन ब्रेस्ट ट्रीटमेंट अन्…

त्यांनी केलेल्या सर्जरीमध्ये लेझर स्किन सर्जरी, सिलिकॉन ब्रेस्ट ट्रीटमेंट आणि फेसलिफ्ट सारख्या उपचारांचा समावेश आहे. जरी त्या नैसर्गिकरित्या सुंदर नसल्या तरी, सर्जरीनंतर त्या खरोखरंच बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री बनल्या. असेही म्हटले जाते की त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच ओठांची सर्जरी केली होती. त्यामुळे भारतात श्रीदेवी यांच्यासारख्या सर्जरी कोणीही केलेल्या नाहीत.


अमिताभ बच्चन ते शाहरूख खानपर्यंत बॉलिवूड स्टार त्यांचे चाहते

दरम्यान त्यांच्याकामाबद्दल नक्कीच सर्वांना माहित आहेत. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधील 269 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक मोठ्या स्टार्ससोबतची त्या केमिस्ट्री कौतुकास्पद होती. अमिताभ बच्चन ते शाहरूख खानपर्यंत बॉलिवूड स्टार त्यांचे चाहते होते. श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचं निधन हा सर्वांसाठीच एक मोठा धक्का होता. पण त्यांचा अभिनय आणि त्यांचे सौंदर्य अजूनही प्रेक्षकांच्याच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्याही मनावर कायमच कोरलं गेलं आहे.