जॅकलीन फर्नांडिस हिला थेट तुरुंगातून हेलीकॉप्टर गिफ्ट… भलंमोठं Love Letter पाहून म्हणाल…

Jacqueline Fernandez: कथित बॉयफ्रेंडचं जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर असलेलं प्रेम.. तुरुंगातून पाठवला आलिशान हेलीकॉप्टर... त्यासोबतच Love Letter... सध्या सर्वत्र अभिनेत्राच्या खासगी आयुष्याची चर्चा...

जॅकलीन फर्नांडिस हिला थेट तुरुंगातून हेलीकॉप्टर गिफ्ट... भलंमोठं Love Letter पाहून म्हणाल...
Jacqueline Fernandez
| Updated on: Feb 15, 2026 | 9:09 AM

Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीला कथित बॉयफ्रेंडने चक्क तुरुंगातून भेटवस्टू पाठवली आहे. जॅकलिन हिला बॉयफ्रेंडने तुरुंगातून आलिशान हेलीकॉप्टर भेट म्हणून पाठवलं आहे. शिवाय एक लव्हलेटर देखील पाठवलं आहे. जॅकलिन हिला लव्ह लेटर दुसरं तिसरं कोणी नाही तर, 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने पाठवला आहे. पत्रात सुकेश याने अभिनेत्रीचा उल्लेख ‘माय बेबी बोम्मा…’ म्हणून केला आहे. एवढंच नाहीतर, जॅकलिन हिला जगातील सर्वात उत्तम व्हेलेंटाईन मानतो.. असं देखील सुकेश म्हणाला आहे.

सुकेश याच्या पत्राची सुरुवात जॅकलिन हिच्या नावाने होते. सुकेश चंद्रशेखर म्हणाली, ‘माय बेबी बोम्मा जॅकलिन… जेथे संपूर्ण जय व्हेंलेटाईन डे साजरा करत आहे. तर मी तुझ्याशिवाय स्वतः अपूर्ण आहे आणि माझ्या मनातील वेदना इतक्या तिव्र आहेत की मी त्या व्यक्त देखील करु शकत नाही. माझ्या प्रत्येक हृदयाचा ठोक मला फक्त एकाच गोष्टीची जाणीव करुन देतो आणि ती म्हणजे, तुझ्या आणि माझ्यातील अंतर… माझ्या प्रत्येक श्वासावर तुझं नाव आहे…’

सुकेश पुढे पत्रात लिहितो, ‘तुरुंगाच्या या कठोर भिंतींनी मला तुझ्यापासून दूर ठेवलं आहे. वाळवंटात हरवलेल्या एका व्यक्तीप्रमाणे मला तुझी आठवण येत आहे… बेबी बोम्मा, मला तुला माझ्या जवळ घ्यायचे आहे आणि तुझ्या कानात गोड बोलायचं आहे.’ सुकेश याने अभिनेत्रीची माफी देखील मागितली… कारण सुकेश याच्यामुळे जॅकलिन हिला कायद्याच्या कचाट्याच अडकावं लागलं…

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुकेश याने जॅकलिन हिने एअरबस-एच सीरीजचे हेलिकॉप्टर व्हॅलेंटाईन भेट म्हणून दिलं आहे. सुकेश म्हणाला, ‘बेबी… मी तुझ्यासाठी खास भेट पाठवलं आहे, जे तुझ्यासाठी तयार केलं आहे. जे तुझ्यासारख्या राणीसाठी परफेक्ट आहे… ‘एयरबस-एच सीरीज हेलीकॉप्टर’ जे आलिशान आहे… जे खास तुझ्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. ज्यावर तुझं नाव लिहिलं आहे, JF…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुकेश याने जॅकलिन हिच्यासाठी पाठवलेल्या लव्हलेटर आणि भेटवस्तूची चर्चा रंगली आहे.