AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यावधी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी करणारी ही अभिनेत्री कोण? जी अभिनयासोबत सौंदर्याने देखील आहे प्रचंड चर्चेत. 10 मिलियन पेक्षा जास्त आहेत फॉलोअर्स.

वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 11, 2026 | 11:58 AM
Share

18 वर्षांच्या वयात मोठं यश मिळवणं हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. मात्र नितांशी गोयल हिने आपल्या मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर हे शक्य करून दाखवलं आहे. अल्पावधीतच तिने केवळ अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही मोठी झेप घेतली आहे. नुकतीच तिने कोट्यवधींची लक्झरी कार खरेदी करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

2023 साली प्रदर्शित झालेल्या लापता लेडीज या चित्रपटातून नितांशी घराघरात पोहोचली. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले होते. या चित्रपटात नितांशीने साकारलेली ‘फूल कुमारी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. तिच्या अभिनयाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले आणि तिच्या करिअरला नवी दिशा मिळाली.

18 व्या वर्षी कोट्यवधींची कार

नितांशीने नुकतीच मर्सिडीज-बेंझ GLE ही प्रीमियम एसयूव्ही खरेदी केली आहे. या गाडीची किंमत सुमारे 1 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. इतक्या कमी वयात अशी महागडी कार घेणे ही मोठी उपलब्धी मानली जाते. तिच्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नवीन कारसोबत नितांशीने खास फोटोशूट केले असून ते फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांमध्ये ती कधी कारजवळ उभी दिसते तर कधी कारवर टेकून पोझ देताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरची आनंदाची झलक स्पष्टपणे दिसून येते. चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लक्झरी आणि दमदार फीचर्स

मर्सिडीज-बेंझ GLE ही कार तिच्या आकर्षक डिझाइन, लक्झरी इंटीरियर आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. या गाडीत शक्तिशाली इंजिन, ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि उत्कृष्ट सस्पेन्शन दिलेले आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले अनेक हायटेक फीचर्स या गाडीत उपलब्ध आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायी आणि सुरक्षित बनतो.

नितांशीच्या या यशाबद्दल तिचे चाहते खूप आनंद व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण तिला शुभेच्छा देत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत आहेत. इतक्या कमी वयात मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.