Jacqueline Fernandez | ‘आय लव यू मेरी जान…’, जॅकलिन हिला तुरुंगातून आलं ‘प्रेमपत्र’

जॅकलीन फर्नांडीस हिला तुरुंगातून आलेल्या लव्हलेटरचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण... सध्या सर्वत्र अभिनेत्रीला आलेल्या 'लव्हलेटर'ची चर्चा...

Jacqueline Fernandez | आय लव यू मेरी जान...,  जॅकलिन हिला तुरुंगातून आलं प्रेमपत्र
| Updated on: Aug 11, 2023 | 11:01 AM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये कायम रंगत असतात. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून २०० कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली येथे तुरुंगात बंद आहे. पण सुकेश तुरुंगातून देखील जॅकलिन हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. आज जॅकलिन हिचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा वाढदिवस आसल्यामुळे सुकेश याने जॅकलिन हिला ‘लव्हलेटर’च्या माध्यमातून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र सुकेश याने जॅकलिन हिला लिहिलेल्या पत्राची चर्चा रंगत आहे.

सुकेश याने हिंदी भाषेमध्ये जॅकलिन हिला प्रेमपत्र लिहिलं आहे. सध्या सर्वत्र जॅकलिन आणि सुकेशने लिहिलेल्या ‘लव्हलेटर’ची चर्चा रंगत आहे. सुकेश यांनी पत्रात लिहिलं आहे ती, ‘जगातील सर्वात सुंदर बोम्मा जॅकी… झाडावर अनेक फुलं बहरतात… त्यामधील एक खास असतो. आयुष्यात अनेक आठवणी असतात. पण त्यातील एक आठवण खास असते… जी मनाला भिडते आणि प्रेमात वेडं करून जाते.. ‘

पुढे सुकेश म्हणतो, ‘आज पहिल्यांदा देवाकडून काही तरी मागितलं आहे.. देवासमोर डोकं टेकवलं आहे… जगातील सर्व सुख मी तुझ्या पायाशी ठेवू… तुझे सर्व दुःख माझे करुन घेवू… तुझं प्रत्येक स्वप्न, इच्छा पूर्ण करु…बार बार दिन ये आए… बार बार दिल ये गाये.. तुम जियो हजारो साल…हॅप्पी बर्थडे..हॅप्पी बर्थडे..आय लव यू मेरी जान…’ असं सुकेश याने पत्रात लिहिलं आहे.

सुकेश यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर दिल्ली तुरुंगात बंद आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिला देखील आरोपी करण्यात आलं आहे. पण अभिनेत्रीने सर्व आरोप फेटाळले आहेत. सध्या सर्वत्र जॅकलिन आणि सुकेश यांच्या प्रेम कहाणीची चर्चा रंगत आहे.

जॅकलीन फर्नांडीस हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सुकेश याच्यासोबत असलेले संबंध समोर आल्यानंतर अभिनेत्री चर्चेत आली. दोघांचे खाजगी फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने स्पष्टीकरण देखील दिलं होतं. जॅकलीन फर्नांडीस हिच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us