
नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : अभिनेता सुनील शेट्टी याचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अहान शेट्टी याचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांचं 11 वर्षांचं नातं तुटल्यामुळे अहान याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. 11 वर्षांचं नातं तुटल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अहान आणि तानिया यांची चर्चा रंगील आहे..
सांगायचं झालं तर, अहान आणि तानिया यांच्यामध्ये दुरावा का निर्माण झाला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एवढंच नाही तर, रंगणाऱ्या चर्चांवर अहान आणि तानिया यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. अहान आणि तानिया यांनी एकत्र शिक्षण घेतलं. दोघांमध्ये सुरुवातीला घट्ट मैत्री होती. त्यानंतर अहान आणि तानिया यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
तब्बल 11 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अहान आणि तानिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट केलेले नाहीत. शिवाय दोघांना गेल्या काही दिवसांपासून एकत्र स्पॉट देखील करण्यात आलेलं नाही. पण इन्स्टाग्रामवर दोघे एकमेकांना फॉलो करत आहेत.
तानिया श्रॉफ ही एक प्रसिद्ध मॉडेल असून उद्योजक जेदेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. सोशल मीडियावर देखील तानिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तानिया कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
तर सुनील शेट्टी याचा मुलगा अहान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अहान याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेत्री तारा सुतारिया हिच्यासोबत अहान याने ‘तडप’ सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. ‘तडप’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान देखील अहान आणि तानिया हिला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण आता अहान आणि तानिया यांचं नातं वेगळ्या वळणावर आहे.