Sunil Lahari: मूडच खराब झाला! ‘रामायणा’तील गाणी ऐकताच ‘लक्ष्मण’ संतापला, टीका करत म्हणाला…

Sunil Lahari On Ramayana Movie Music: रामायणा चित्रपटांतील गाण्यांवर अभिनेता सुनील लहरी याने एक व्हिडिओ शेअर करत स्वत:चे मत मांडले आहे.

Sunil Lahari: मूडच खराब झाला! रामायणातील गाणी ऐकताच लक्ष्मण संतापला, टीका करत म्हणाला...
| Updated on: Nov 04, 2026 | 12:48 PM

Sunil Lahari On Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण पार्ट १’ च्या प्रदर्शनाला २४ तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित हा भव्य चित्रपट जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ५०,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि विशेषतः गाणी प्रदर्शित झाल्यापासून लोकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटाच्या संगीताने, विशेषतः कव्वालीच्या सुराने अनेकांना निराश केले. यासाठी संगीतकार ए. आर. रहमान यांना सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. आता, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहरी यांनीही आपली निराशा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी चित्रपटातील कलाकारांच्या मेहनतीचे कौतुकही केले आहे.

अभिनेता सुनील लाहरी यांनी त्यांच्या एक्स (X) अकाउंटवर जवळपास अडीच मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘रामायण भाग १’ हा एक मोठ्या बजेटचा चित्रपट असून त्यावर अनेक लोकांची उपजीविका अवलंबून आहे, त्यामुळे तो यशस्वी व्हावा अशी मी प्रार्थना करतो, अनेक लोकांनी मला या चित्रपटाबद्दल माझे विचार आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा सल्ला दिला आहे. कदाचित कारण मी एकेकाळी ‘रामायणा’चा एक भाग होतो. तो काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे. मी चित्रपट पाहिलेला नाही. मी ना संशोधक आहे, ना तज्ञ, ना या विषयावरील अधिकारी. मी या महाकाव्यावर टीका कशी करू शकेन? पण मी हे निश्चितपणे म्हणू शकतो की हे एक महान महाकाव्य आहे. केवळ आपल्या भारतीयांसाठीच नाही, तर जगभरातील मानवतेसाठी.”

Loading...

सुनील लाहिरी पुढे म्हणतात, “आपली संस्कृती, मूल्ये, भावना, संवेदना आणि श्रद्धा यातच रुजलेली आहे. आपण सर्वांनी या वारशाची काळजी घेतली पाहिजे. मला केवळ आशा नाही, तर पूर्ण विश्वास आहे. नितेशजी खूप चांगले दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. ते आणि या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार अत्यंत प्रतिभावान आहेत. त्या सर्वांनी मिळून खूप मेहनत घेतली आहे आणि एक खूप चांगला चित्रपट बनवला आहे.”

मात्र, त्यांनी ‘रामायण’मधील गाणी आणि संगीताबद्दल काहीशी निराशाही व्यक्त केली. ते म्हणाले, “या महाकाव्यात संगीताची भूमिका खूप महत्त्वाची आहे. एक प्रकारे, तो त्याचा कणा आहे. या चित्रपटासाठी मी जे संगीत ऐकले आहे, त्यातील काही गाण्यांमधील काही आवाजांनी मला थोडे निराश केले. मला वाटते की, या गाण्यांमागील संगीतात मिथिला किंवा अयोध्या येथील स्थानिक रंगत प्रतिबिंबित व्हायला हवी होती. मी या विषयातील तज्ञ नसलो तरी, एक चांगला श्रोता म्हणून हे माझे विचार आहेत.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us