
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. गदर 2 (Gadar 2) चित्रपटात सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेल मुख्य भूमिकेत आहे. अजूनही चित्रपटाची एक हवा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठे क्रेझ नक्कीच बघायला मिळाले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि अमीषा पटेल हे दिसले.
गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यापासून सनी देओल हा सतत चर्चेत आहे. नुकताच सनी देओल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सनी देओल हा आपल्या कुटुंबाविषयी आणि आपले लहानपण नेमक्या कोणत्या वातावरणात गेले हे सांगताना दिसला. इतकेच नाही तर यावेळी सनी देओल हा आपले वडील धर्मेंद्र यांची पोलखोल करताना दिसला.
सनी देओल हा म्हणाला की, माझी आजी (धर्मेंद्र यांची आई) खूप जास्त चांगल्या स्वभावाची होती. एकदा माझ्या वडिलांनी रागा रागामध्ये आमच्या घरात असलेल्या एका नोकराला शिवी दिली. त्यानंतर ही गोष्ट माझ्या आजीला कळाली आणि ती खूप जास्त नाराज झाली. मात्र, ती फक्त नाराजच झाली नाही तर तिने वडिलांना धडा शिकवण्याचे ठरवले.
माझ्या आजीने थेट त्या नोकराला फोन केला. आजीने सांगितले की, तुला धर्मेंद्रने शिवी दिली ना? आता तू धर्मेंद्रला शिवी दे…माझ्या आजीचा स्वभाव खूप वेगळा होता. ती तिच्या डोळ्यांसमोर कोणावरही अन्याय होताना अजिबात बघू शकत नव्हती. मी माझ्या आजीसोबतच जास्त वेळ राहिलो आहे आणि तिचे संस्कार माझ्यामध्ये आहेत.
माझी आजी खूप जास्त दयाळू देखील होती. त्यामुळेच माझा स्वभाव देखील तिच्यासारखाच आहे. मी लहानपणी खूप जास्त खोडकर होतो. एकदा माझ्या वडिलांनी मला मारले, त्यामुळे देखील माझी आजी नाराज झाली होती. माझ्या आजीला आम्ही बीजी बोलत होतो. सनी देओल याची ही मुलाखत सध्या चांगली चर्चेत आलीये.
एका चित्रपट निर्मात्याने सनी देओल याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे केले. सनी देओल याच्यावर झालेल्या आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. चित्रपट निर्माता म्हणाला की, मी 27 वर्षांपूर्वी सनी देओल याला 2 कोटी रूपये दिले होते. मात्र, अनेकदा मागूनही त्याने माझे पैसे हे परत केले नाहीयेत.