
Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. नुकताच सनीच्या घरी फराह खान कुक दिलीप याच्यासोबत पोहोचली… तेथे फराह आणि दिलीप यांनी सनी आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली आणि गप्पा मारल्या… त्यांनी सनी हिची मुलगी निशा कौर वेबर आणि दोन मुलं अशर कौर वेबर आणि नोआ सिंह वेबर यांच्याशी देखील संवाद साधला… यावेळी सनीने फारहा हिला लेकीबद्दल सांगितलं, जी वयाच्या 10 व्या वर्षी 999 रुपयांचं सामान विकून पैसे कमावते… सध्या सर्वत्र सनी हिची दत्तक लेक निशा हिची चर्चा रंगली आहे.
सनी लियोनी हिने फराह खानन हिला सांगितलं, ‘निशा हिला माहिती आहे की, ती दत्तक मुलगी आहे… ती खूप प्रेमळ आहे…’ यावर खिल्ली उडवत फराह म्हणाली, ‘खूप भाग्यशाली मुलगी आहे…’ सनी पुढे म्हणाली, ‘निशा खूप हूशार आणि टॅलेंटेड आहे… तिने जे काही बनवलं आहे, त्याचं आता पेटेंट झालं आहे आणि त्यामधून निशा हिने कमाई करण्यास देखील सुरुवात केली आहे…’, फराह म्हणते, ‘आता घरी जाऊन मी माझ्या मुलांना मारणार…’
सनी हिने फराह हिला निशाने तयार केलेलं सामान दाखवलं आणि म्हणाली, ‘हे एक प्रोटोटाईप आहे आणि याला बू बॉक्स असं म्हणतात… अनेक मुलांप्रमाणे निशा हिला देखील धुळीची एलर्जी आहे. म्हणून तिच्या भोवती सर्वत्र टीशू पेपर पसरलेले असायचे… मी तिला सांगायचे आळस करु नकोस, टीशू डस्टबिनमध्ये टाक… त्यानंतर एक दिवस मी घरी आले तेव्हा पाहिलं, निशाने टेपच्या मदतीने टीशू बॉक्सवर एक डिस्पोजल कप चिटकवला होता… मी जेव्हा ते पाहिलं मला ते चांगलं वाटलं…’
फराह खान हिने देखील निशा हिने बनवलेली वस्तू पाहिली आणि तिला देखील आनंद झाला… यावर फराह म्हणाली, ‘व्वा, हे खरोखरच हुशार आणि सोपे आहे.’, पुढे सनी म्हणाली, ‘आता माझ्या दोन्ही मुलांना हेवा वाटतो… निशा हिच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असेल आणि त्यांच्याकडे काहीच नाही … मुलांना कायम तिच्याकडून पैसे मागावे लागतील…’ सांगायचं झालं, निशा हिने तयार केलेल्या बू बॉक्सची किंमत 999 रुपये आहे.
सनी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2011 मध्ये डेनियल वेबर याच्यासोबत लग्न केलं.. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी निशा हिला दत्तक घेतलं. त्यानंतर 2018 मध्ये नूह आणि अशर यांचं सरोगेसीच्या माध्यमातून जगात स्वागत केलं.