
Sunny Leone on Past Life : एडल्ड स्टार म्हणून ओळख असणाऱ्या सनी लियोनी हिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना केला… आज सनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे… रिऍलिटी शोसोबतच सनी अनेक म्यूझीक व्हिडीओमध्ये देखील दिसली… पण बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सनीची सर्वत्र चर्चा रंगलेली असायची… बी – ग्रेड सिनेमांमध्ये काम केल्यामुळे तिच्यावर बी – ग्रेड अभिनेत्रीचा टॅग लागला होता… पण याचा सनी हिला पश्चाताप नाही… असं खुद्द अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर सनी हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सनी हिने स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याचा मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘आता मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे… पती आणि 3 मुलांसोबत मी आनंदाने जगत आहे…’
सनी म्हणाली ‘माझं नाव सनी लियोनी आहे आणि मी माझ्या भूतकाळात काय केलं आहे… हे देखील तुम्हा सर्वांना माहिती आहे… तुम्ही सर्वांनी मला जज केलं… लोकांमध्ये होणाऱ्या चर्चा ऐकून मला कदाचित थोडी तरी लाज वाटायला हवी होती… पण मला बिलकूल लाज वाटत नाही…’
‘जे लोक माझा विरोध करतात, त्यांची मी काळजी करत नाही… कारण मी माझ्या घरातील सोफ्यावर माझ्या पतीसोबत आणि तीन मुलांसोबत निवंतपणे बसते… माझ्या हातात वाईनचा ग्लास असत आणि माझ्या मनात माझ्या भूतकाळाबद्दल थोडाही पश्चाताप नाही आणि हाच माझा आनंदी शेवट आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…
सनी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, सनी तीन मुलांची आई आहे. त्यामध्ये एक मुलगी आहे. मुलीला सनी हिने दत्तक घेतलं आहे. पती डॅनियल आणि सनी यांना मुली हव्या होत्या… असं देखील अभिनेत्री मुलखातीत म्हणाली होती. पुढे सनी म्हणाली, ‘अंधेरीमध्ये एक जागा आहे, जेथे लहान – लहान मुली होत्या. मी एका मुलीला तेथून दत्तक घेतलं.’
सनी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सनी हिचे दोन मुलं आणि एका मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सनीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सनी लियोनी हिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.