34 वर्षांपूर्वीच्या या गाण्यात माधुरी दीक्षितने दिलेत अनेक बोल्ड सीन, 21 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, आज होतो पश्चाताप

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने 34 वर्ष जुन्या या गाण्यामध्ये दिलेत मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन. 21 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केला रोमान्स. मात्र, आता तिला होता पश्चाताप.

34 वर्षांपूर्वीच्या या गाण्यात माधुरी दीक्षितने दिलेत अनेक बोल्ड सीन, 21 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, आज होतो पश्चाताप
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 22, 2026 | 12:54 PM

Madhuri Dixit old Superhit Song: बॉलिवूडची धक-धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यासोबत तिची अनेक गाणी देखील प्रचंड हिट ठरली आहेत. 80-90 च्या दशकात माधुरी दीक्षितची अनेक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्याच काळात एक असं गाणं रिलीज झालं होतं ज्याची आजही तितकीच चर्चा होते. हे गाणं आजपासून तब्बल 34 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं आणि यात बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिने आपल्या करिअरमधील सर्वात बोल्ड आणि इंटीमेट सीन दिले होते.

त्या काळात माधुरी दीक्षित प्रसिद्धीच्या शिखरावर होती. तिच्या प्रत्येक भूमिकेची आणि गाण्याची प्रचंड चर्चा चाहत्यांमध्ये व्हायची. अशाच एका गाण्याने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र नंतर त्याच गाण्याबद्दल तिने मनापासून खंतही व्यक्त केली.

‘दयावान’ चित्रपट आणि वादग्रस्त गाणं

1988 मध्ये रिलीज झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना दिसले होते. याच चित्रपटातील गाजलेलं गाणं म्हणजे ‘आज फिर तुम पर प्यार आया है’. या गाण्यात माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातील रोमँटिक आणि इंटीमेट सीन त्या काळासाठी खूपच बोल्ड मानले गेले. जरी हे सीन अश्लील नसले तरी माधुरीचे डोळ्यांचे भाव, बॉडीचे हावभाव आणि नृत्याच्या हालचालींमुळे हे गाणं अत्यंत बोल्ड आणि लक्षवेधी ठरलं.

‘आज फिर तुम पर प्यार आया है’ या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अधूर्‍या प्रेमाची तडफड, भावना आणि पावसात भिजलेला रोमान्स प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं आणि आजही लाखो चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं आहे.

माधुरी दीक्षितची कबुली

माधुरी दीक्षितचा हा चित्रपट प्रचंड हिट झालाच त्यासोबत तिचे हे गाणं देखील प्रचंड हिट झालं. या गाण्यामधील सीन पाहून अनेक प्रेक्षक थक्क झाले होते. काहींसाठी ते बोल्ड होते तर काहींनी ते डोळे झाकून पाहावे असे सीन असल्याचंही म्हटलं. मात्र, त्या काळातील प्रेमी युगुलांनी या गाण्याला भरभरून दाद दिली.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने या गाण्याबद्दल आणि ‘दयावान’ चित्रपटातील इंटीमेट सीनबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. ती म्हणाली, ‘या सीननंतर मला खूप निराश वाटलं होतं. तो माझ्यासाठी शिकण्याचा काळ होता. आयुष्यात प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकायला मिळतं आणि यातूनही मी बरंच काही शिकले’. त्यानंतर अशा प्रकारचे सीन करणे हे तिच्यासाठी योग्य नाही असं तिला वाटलं. त्यानंतर तिने अशा भूमिकांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.