Allu Arjun In Waves Summit 2025 : सिक्स पॅक करण्यासाठी हिरोईनकडून घेतली प्रेरणा, अल्लू अर्जुननं सांगितलं फिटनेसचं महत्त्व!

पुष्पा या चित्रपटामुळे तर तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्लू अर्जुनने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक नव्या प्रथा स्थापित केल्या आहेत. आजघडीला अल्लू अर्जुन हा पॅन इंडिया सुपरस्टार झालेला आहे.

Allu Arjun In Waves Summit 2025 : सिक्स पॅक करण्यासाठी हिरोईनकडून घेतली प्रेरणा, अल्लू अर्जुननं सांगितलं फिटनेसचं महत्त्व!
allu arjun
| Updated on: May 05, 2025 | 8:34 PM

Allu Arjun In WAVES Summit 2025 : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुनला आज देश तसेच जगभरात नवी ओळख मिळाली आहे. पुष्पा या चित्रपटामुळे तर तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्लू अर्जुनने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक नव्या प्रथा स्थापित केल्या आहेत. आजघडीला अल्लू अर्जुन हा पॅन इंडिया सुपरस्टार झालेला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सिक्स पॅक असणारा हा पहिला अभिनेता आहे, असे मानले जाते. आजघडीला सिक्स पॅक असणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अभिनेता शरीराने फिट असणे गरजेचे आहे. अल्लू अर्जुन वेव्स समिट 2025 पाहुणा म्हणून आला होता. यावेळी त्याने सिक्स पॅक, अभिनेत्यांचे आरोग्य, पर्सनॅलिटी यावर भरपूर गप्पा केल्या.

टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी अल्लू अर्जुनसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. या संवादात बरुण दास यांनी अर्ल्लू अर्जुनला अनेक प्रश्न विचारले. तुम्ही तुमच्या शरीराची कशी काळजी घेता? तुम्ही फिटनेस कशी मेन्टेन ठेवता? यामागचं रहस्य काय आहे? असं बरुण दास यांनी अल्लू अर्जुनला विचारलं.

दोन दशकाआधी कोणत्याही…

या प्रश्नांची उत्तरं देताना अल्लू अर्जुन म्हणाला की, एखाद्या अभिनेत्यासाठी फिटनेस आणि शरीर फारच महत्त्वाची बाब आहे. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत फिटनेसवर लक्ष दिलं जातं पण सिक्स पॅककडे एवढं लक्ष नसतं. सिक्स पॅक्स असणं हे परंपरा आणि संस्कृतीशीदेखील जोडलेलं आहे. दोन दशकाआधी कोणत्याही दाक्षिणात्त्य सिनेस्टारने सिक्स पॅकबद्दल विचार केला नव्हता. कारण संस्कृती हादेखील यामागाचे कारण आहे हे नाकारता येत नाही, असे अल्लू अर्जुनने सांगितले.

सिक्स पॅक असणे हे…

तसेच, अभिनेत्यांना सिक्स पॅक असणे हे दक्षिणेतील रसिकांनी सहासहजी स्वीकारलेले नाही. दक्षिणेतील प्रथा, परंपरांमुळेही लोकांना हे स्वीकारायला वेळ लागला. सिक्स पॅक असणे हे विद्रोह करण्यासारखे होते. मात्र एकदा सिक्स पॅक केले तर त्याचे परिणाम चांगले होऊ शकतात, हे मला माहिती होते. त्यामुळेच मोठी हिंम्मत करून मी सिक्स पॅक बनण्याचा निर्णय घेतला, असेही अल्लू अर्जूनने सांगितले.

अभिनेत्रीने दिलं चॅलेन्ज

दरम्यान, सिक्स पॅक बनवण्याची प्रेरणा मला एका अभिनेत्रीकडून मिळाली, अशी माहिती अल्लू अर्जुनने सांगितली. या अभिनेत्रीचे नाव मात्र त्याने सांगितले नाही. त्या अभिनेत्रीने दिलेला सल्ला मी एक चॅलेंज म्हणून स्वीकारला, असं अल्लू अर्जुनने सांगितले. यासह सिक्स पॅक्सचे इतरही काही फायदे आहेत, असंही त्याने सांगितलं.

फिटनेस ही फारच महत्त्वाची बाब..

आजघडीला फिटनेस प्रत्येक अभिनेत्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे. भारतीय सिनेमात अभिनेता फक्त फाईटच नव्हे तर डान्सदेखील करतो. भारतात अभिनेत्याला पळावं लागतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपल्याला शूटिंगसाठी कधी बोलावले जाईल, याचा काही नेम नाही. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही शरीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे, असंही अल्लू अर्जुनने सांगितलं.