Sharad Kapoor : त्याला आपली गरज…शरद कपूरसाठी देवदूत ठरणार सिने-वर्कर्स असोसिएशन, निर्मात्यांना केलं आवाहन

Sharad Kapoor : AICWAनं निर्मात्यांना शरद कपूरला काम देण्याचं आवाहन केलं आहे.

Sharad Kapoor : त्याला आपली गरज...शरद कपूरसाठी देवदूत ठरणार सिने-वर्कर्स असोसिएशन, निर्मात्यांना केलं आवाहन
| Updated on: Nov 14, 2026 | 8:53 PM

‘जोश’ चित्रपटातील अभिनेता शरद कपूरच्या एका अलीकडील व्हिडिओनं लोकांना भावूक केलं आहे. यानंतर, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननं (AICWA) बॉलिवूड आणि भारतीय चित्रपटसृष्टीला आवाहन केलं आहे की, शेखरला त्याच्या योग्यतेनुसार काम द्यावं. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामला गुप्ता यांनी एक व्हिडिओ शेअर करून आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांना आणि सेलिब्रिटींना शरद कपूरला पाठिंबा देण्याचं आणि त्याला काम देण्याचं आवाहन केलं आहे.

चित्रपटसृष्टीला AICWA चं आवाहन

Loading...

चित्रपटसृष्टीतील अनिश्चिततेबद्दल बोलताना सुरेश म्हणाले की, ‘शेखर फक्त ५० वर्षांचा आहे. त्याला आज आपली गरज आहे. या इंडस्ट्रीचं कटू सत्य हे आहे की, तुम्हाला आज काम मिळेल, पण पुढचं काम १० दिवसांनी, एका वर्षानं, दोन वर्षांनी किंवा कदाचित कधीच मिळणार नाही. हे सर्वात मोठं कटू सत्य आहे. कामाची किंवा आयुष्याच्या सुरक्षेची कोणतीही हमी नाही. त्यामुळे, प्रत्येकानं शरद कपूरला पाठिंबा दिला पाहिजे. आज त्याला खरोखरच आपली गरज आहे आणि तुम्ही इंडस्ट्रीमध्ये अनेकदा अशाच परिस्थिती पाहिल्या असतील.’

सुरेश पुढे म्हणाले, ‘आज अनेक अभिनेते पुढे येत आहेत, कारण इंडस्ट्री खूप कठीण काळातून जात आहे. काम कमी आहे आणि त्यांचं भविष्य धोक्यात आहे. त्यांना किती काळ काम मिळेल? कोणत्या वयापर्यंत काम मिळेल? हा नेहमीच एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे, आपण शरद कपूरला मदत केली पाहिजे. आज आपल्या इंडस्ट्रीची ही अवस्था आहे, म्हणून आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.’

दरम्यान, अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी शरद कपूरची भेट घेतली. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये शरद कपूरनं CINTAA ला त्याच्यासाठी काही चांगलं काम शोधण्याचं आवाहन केलं आहे. व्हिडिओमध्ये शरद म्हणाला, ‘मला CINTAA ला आवाहन करायचं आहे की, मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, आणि मला माहीत आहे की, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी एक उत्तम अभिनेता आहे आणि हे तुम्हाला माहीत आहे. पैशांचा प्रश्न नाही. फक्त मला पुन्हा काम सुरू करायचं आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us